श्रीलंकन संसदीय निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर पक्ष विजयी

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या पक्ष ‘नॅशनल पीपल्स पॉवर’ (एनपीपी) शुक्रवारी (दि. १५) रोजी संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक निकालांवरून एकूण १९६ जागांपैकी एनपीपीने १४४ जागा जिंकल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 17 Nov 2024
  • 03:49 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रपती दिसानायकेंच्या आघाडीचा विजय; १४१ जागा जिंकल्या, ६१ टक्के मते; बहुमतासाठी १३३ जागांची आवश्यकता

कोलंबो  : श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या पक्ष ‘नॅशनल पीपल्स पॉवर’ (एनपीपी) शुक्रवारी (दि. १५) रोजी संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक निकालांवरून एकूण १९६ जागांपैकी एनपीपीने  १४४ जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एनपीपीला ६१ टक्के म्हणजे ६८ लाख मते मिळाली आहेत. देशाच्या दक्षिणेकडील एका प्रमुख सिंहली पक्षाने हा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे समर्थित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ ५ टक्के मते आणि ३ जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी श्रीलंकेच्या राजकारणात वर्चस्व गाजवणारा राजपक्षे कुटुंबाचा श्रीलंका पीपल्स फ्रंट (एसएलपीपी) पक्ष २ जागांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

जाफना या तामिळ जिल्ह्यातही एनपीपीचा विजय झाला. येथे एनपीपीने ६ पैकी ३ जागा जिंकल्या आहेत. एनपीपीच्या विजयाने पारंपरिक तमिळ पक्षांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार (दि. १४)  नोव्हेंबर रोजी मतदान झाले. प्रमुख विरोधी पक्ष एसजेबी पक्ष १८ टक्के मते आणि ३५ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेच्या संसदेत २२५ जागा आहेत. बहुमतासाठी ११३ चा आकडा आवश्यक आहे. अध्यक्ष दिसानायके यांना या निवडणुकीत बहुमत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संसदेची मंजुरी मिळाल्यानंतरच राष्ट्रपती दिसानायके सरकारची महत्त्वाची धोरणे राबवू शकतात. गेल्या वेळी दिसानायके यांच्या पक्षाला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. ऑगस्ट २०२० मध्ये श्रीलंकेत शेवटच्या संसदीय निवडणुका झाल्या होत्या. अशा स्थितीत पुढील वर्षी नवीन निवडणुका होणार होत्या. मात्र या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर अनुरा कुमारा दिसानायके यांनी संसद विसर्जित केली. त्यानंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या.

दिसानायके यांनी कार्यवाह राष्ट्रपतींचे अधिकार कमी करण्याचे आश्वासन दिले. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानुसार, संसदीय निवडणुकीत ८ हजार ८२१ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली अंतर्गत मतदार २२ मतदारसंघातून १९६ सदस्यांना थेट संसदेसाठी निवडतात. उर्वरित २९ जागांचे प्रमाणिक मतानुसार वाटप केले जाते.

निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार पक्षाला २९ जागांवर वाटा मिळतो. एक मतदार प्राधान्याच्या आधारावर ३ उमेदवारांना मतदान करू शकतो.

अल जझीराच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांचे मत आहे की, देशाची सत्ता मुख्यत्वे 'कार्यवाहक राष्ट्रपती'च्या हाताखाली आहे. ही शक्ती कमी करण्याचे आश्वासन देऊन ते निवडणुकीत उतरले, पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करावे लागतील. यासाठी त्यांना दोन तृतीयांश जागांची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत या अनेक जागा जिंकण्याचे आवाहन दिसानायके यांनी जनतेला केले होते. श्रीलंकेत कार्यकारी अध्यक्षपद प्रथम १९७८ मध्ये अस्तित्वात आले. तेव्हापासून त्यावर टीका होत असली तरी सत्तेत आल्यानंतर आजपर्यंत एकाही पक्षाने आपली सत्ता नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाही. दिसानायके यांनी रानिल विक्रमसिंघे यांच्या काळात भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आणि IMF सोबतच्या करारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest