एका झटक्यात निम्म्या कर्मचाऱ्यांना नारळ

न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका म्युझिकल इंस्ट्रुमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (सीईओ) राग आला म्हणून ९९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याबाबत कंपनीच्या एका इंटर्नने सीईओच्या निर्णयाबद्दल रेडिटवर पोस्ट केली आहे.

संग्रहित छायाचित्र

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला राग अनावर, १११ कर्मचाऱ्यांपैकी ९९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका म्युझिकल इंस्ट्रुमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (सीईओ) राग आला म्हणून ९९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याबाबत कंपनीच्या एका इंटर्नने सीईओच्या निर्णयाबद्दल रेडिटवर पोस्ट केली आहे. सीईओला राग आल्याने त्याने ९९ जणांना कामावरून काढून टाकले.

रेडिटवर एका यूझर्सने  दावा केला की तो इंटर्न म्हणून संगीत वाद्य खरेदीसाठी  बाजारात गेला होता. मात्र, तासाभरातच त्याला कामावरून काढून टाकण्याचा मेल आला. थोड्या वेळात कंपनीच्या १११ कर्मचाऱ्यांपैकी ९९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे त्याला कळले. मुख्य कार्यकारी अधिकारी  कर्मचाऱ्यांच्या संख्येवरून तो गंभीर नसल्याची त्याच्यावर टीका झाली होती.  

कंपनीच्या सीईओने एक बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक कर्मचारी हे गैरहजर राहिले. त्यांनी ही बैठक गांभीर्याने घेतली नाही. यामुळे संतापलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तब्बल ९९ जणांना कामावरून काढून टाकले. कर्मचारी  बैठकीला न आल्याने नाराज झालेल्या सीईओंनी कर्मचाऱ्यांना निरोप पाठवला, 'तुम्हा सर्वांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तुमच्यापैकी जे आज सकाळी बैठकीला आले नाहीत, त्यांना कामावरून काढल्याची ही अधिकृत नोटीस समजा.

तुम्ही कंपनी रुजू करताना जी आश्वासने दिली ते पूर्ण करण्यास तुम्ही असमर्थ ठरला आहात. तुम्ही कारारातील तरतुदी पूर्ण करण्यात अपयशी ठरला आणि आपण ज्या बैठकांना उपस्थित राहणे आणि काम करणे अपेक्षित होते ते करण्यासही तुम्ही अपयशी ठरला आहात.

बैठकीत उपस्थित होते केवळ ११ कर्मचारी

संतापलेल्या सीईओंनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना केली, मी कंपनी आणि कर्मचारी यांच्यात झालेले सर्व करार रद्द करत आहे. कृपया तुमच्याकडे कंपनीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या परत करा. तसेच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया खात्यातून बाहेर पडा. या सोबतच स्वत:ला कंपनीच्या स्लॅकमधूनही काढून टाका.

मी तुम्हाला तुमचे आयुष्य सुधारण्याची व अधिक मेहनत करण्याची आणि भविष्यात प्रगती करण्याची संधी दिली. तरीही तुम्ही ती गांभीर्याने घेतली नाही, हे तुम्ही सिद्ध केले आहे. १११ जणांपैकी केवळ ११ जण बैठकीला उपस्थित होते. ते ११ वगळता बाकीच्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest