कोलंबो : श्रीलंकेमध्ये हरिणी अमरसूर्या यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या आघाडीने म्हणजे एनपीपीने विजय मिळविला होता. सोमवारी (दि. १८) रोजी स्थापन झालेल्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. श्रीलंकेत पंतप्रधानपद भूषवणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्या आधी सिरिमाओ भंडारनायके (३ वेळा) आणि चंद्रिका कुमारतुंगा (१ वेळा) यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या. सन २०२० मध्ये हरिणी अमरसूर्या पहिल्यांदाच खासदार झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी अमरसूर्या श्रीलंका मुक्त विद्यापीठात प्राध्यापक होत्या.
हरिणी अमरसूर्या यांनी सन १९९१ ते १९९४ या काळात दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. मागच्या ५ वर्षांपूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. श्रीलंकेत दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या. राष्ट्रपती झाल्यानंतर दिसानायके यांनी त्यांना पंतप्रधान केले.
राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी राष्ट्रपती सचिवालयात मंत्रिमंडळ सदस्यांना पदाची शपथ दिली. या मंत्रिमंडळात राष्ट्रपतींसह २२ सदस्य आहेत. २ महिला आणि २ तामिळ खासदारांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. बाकी मंत्र्यांची नावे नंतर जाहीर केली जातील. श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार कॅबिनेट मंत्र्यांची संख्या ३० पेक्षा जास्त आणि उपमंत्र्यांची संख्या ४० पेक्षा जास्त असू शकत नाही. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी दिसानायके यांनी मंत्रिमंडळ लहान ठेवले आहे.
अमरसूर्या या श्रीलंकेत पंतप्रधानपद भूषवणाऱ्या तिसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी सिरिमाओ भंडारनायके (३ वेळा) आणि चंद्रिका कुमारतुंगा (१ वेळा) या देशाच्या महिला पंतप्रधान होत्या. सन २०२० मध्ये हरिणी अमरसूर्या पहिल्यांदाच खासदार झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी अमरसूर्या श्रीलंका मुक्त विद्यापीठात प्राध्यापक होत्या.
सन २०१५ मध्ये त्या सरकारविरोधातील आंदोलनात सामील झाल्या. या दरम्यान, त्या दिसानायके यांच्या संपर्कात आल्या आणि 2019 मध्ये त्या जनता विमुक्ती पेरामुना या पक्षात सामील झाल्या. सन २०२० मध्ये संसदीय निवडणुका जिंकून त्या पहिल्यांदाच खासदार झाल्या.
श्रीलंकेत १४ नोव्हेंबरला संसदीय निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांची आघाडी एनपीपीने विजय मिळवला होता. सोमवारी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. यात त्या हंगामी पंतप्रधान होत्या.
अमरसूर्या यांनी सन १९९१ ते १९९४ या काळात दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ५ वर्षांपूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. श्रीलंकेत दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या. राष्ट्रपती झाल्यानंतर दिसानायके यांनी त्यांना पंतप्रधान केले.
राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी राष्ट्रपती सचिवालयात मंत्रिमंडळ सदस्यांना पदाची शपथ दिली. या मंत्रिमंडळात राष्ट्रपतींसह २२ सदस्य आहेत. २ महिला आणि २ तामिळ खासदारांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. बाकी मंत्र्यांची नावे नंतर जाहीर केली जातील. श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार कॅबिनेट मंत्र्यांची संख्या ३० पेक्षा जास्त आणि उपमंत्र्यांची संख्या ४० पेक्षा जास्त असू शकत नाही. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी दिसानायके यांनी मंत्रिमंडळ लहान ठेवले आहे.
सन २०१५ मध्ये त्या सरकारविरोधातील आंदोलनात सामील झाल्या. या दरम्यान, त्या दिसानायके यांच्या संपर्कात आल्या आणि सन २०१९ मध्ये त्या जनता विमुक्ती पेरामुना या पक्षात सामील झाल्या. सन २०२० मध्ये संसदीय निवडणुका जिंकून त्या पहिल्यांदाच खासदार झाल्या.