ब्रिटनच्या नॉर्थम्बरलँडमधील ऑटरबर्न लष्करी रेंजमध्ये मद्यधुंद सैनिकांचा प्रताप

लंडन : ब्रिटिश लष्कराकडे अपाचे नावाचे एक प्रसिद्ध हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरच्या दैनंदिन तपासणी दरम्यान एक आश्चर्यकारक गोष्ट उघडकीस आली. ब्रिटनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रामध्ये एएच-६४ या गनशिपची रात्रीची तपासणी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, हेलिकॉप्टरचे रोटर्स विचित्र पद्धतीने वर-खाली होत आहेत.

लंडन : ब्रिटिश लष्कराकडे अपाचे नावाचे एक प्रसिद्ध हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरच्या दैनंदिन तपासणी दरम्यान एक आश्चर्यकारक गोष्ट उघडकीस आली. ब्रिटनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रामध्ये एएच-६४ या गनशिपची रात्रीची तपासणी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, हेलिकॉप्टरचे रोटर्स विचित्र पद्धतीने वर-खाली होत आहेत.

त्याबरोबरच आतून विचित्र आवाजदेखील येत असल्यामुळे सगळे कर्मचारी सतर्क झाले. त्यांनी तत्काळ त्या हेलिकॉप्टरचे दरवाजे उघडून आतमध्ये तपासणी केली असताना त्यांच्या आश्चर्याला सीमाच उरली नाही. कारण दोन सैनिक मद्यधुंद अवस्थेमध्ये पूर्णपणे सैनिकी वेशामध्ये एका नागरी पोषाखातील महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवताना आढळून आले. कर्मचाऱ्यांना दोन्ही सैनिक अर्धनग्न अवस्थेमध्ये आढळून आले. त्याबरोबरच दोघेही मद्यधुंद होते.

आर्मी एअर कॉर्प्सचे अपाचे हे लढाऊ हेलिकॉप्टर हे उच्चतम तंत्रज्ञानाने युक्त असे अत्यंत घातक शस्त्र आहे. ज्याची किंमत ८.५ दशलक्ष पौंड (७५ कोटी रुपये) इतकी आहे. या हेलिकॉप्टरला ३० मिमीची तोफ जोडलेली आहे. त्याबरोबरच हेलफायर या घातक क्षेपणास्त्रांनी हे हेलिकॉप्टर सुसज्ज असते. त्यामुळे या सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या हेलिकॉप्टरच्या नियमित तपासणी दरम्यान कर्मचाऱ्यांना मागील कॉकपिटमध्ये दोन सैनिक लैंगिक संभोगाच्या क्रियेमध्ये आढळून आले.

दोन सैनिक आत सेक्स करत असल्याचे पाहून आश्चर्यचकित झाले. दोन्ही पुरुषांनी सैन्याचा गणवेश घातलेला होता, तर महिला नागरी पोशाखात होती. मिलिटरी एव्हिएशन अथॉरिटीला दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही सैनिकांना हेलिकॉप्टरमधून बाहेर येण्यास आणि कपडे घालण्यास सांगण्यात आले. दोघांमध्ये मद्याच्या नशेची लक्षणे दिसून आली. पकडण्यात आलेले हेलिकॉप्टर आर्मी एअर कॉर्प्सच्या ६५३ स्क्वॉड्रनचे होते. दोघेही सैनिक वेगळ्या आर्मी युनिटचे होते. त्यांचे मूळ युनिट आणि ६५३ स्क्वाड्रनची चेन ऑफ कमांड घटनास्थळी येईपर्यंत त्यांना ताब्यात घेण्यात आले. असे लष्करी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या अहवालात म्हटले आहे.

सनच्या मते, नॉर्थम्बरलँडमधील ऑटरबर्न रेंजमध्ये सन २०१६ मध्ये ही घटना घडली होती. मात्र, तांत्रिक बिघाडाचे अहवाल  अलीकडेच जेव्हा सार्वजनिक करण्यात आले. तेव्हा हे प्रकरण बाहेर आले. या घटनेनंतर एअर क्रूला हेलिकॉप्टर कुलूपबंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story