‘हिजबुल’चा टॉप कमांडर ठार
#काबूल
हि जबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर बशीर अहमद पीर पाकिस्तानातील रावळपिंडी येथे ठार झाला. एका हल्लेखोराने रावळपिंडीतील एका दुकानाबाहेर पीरवर गोळ्या झाडल्या, यातच त्याचा मृत्यू झाला.
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी बशीरला दहशतवादी घोषित करण्यात आले होते. माजी अतिरेक्यांना हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा यांसारख्या आघाडीच्या संघटनांशी जोडण्यासाठी अनेक ऑनलाइन कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता.
बशीर घराजवळील मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेला होता. मशिदीतून बाहेर आल्यानंतर तो एका दुकानाजवळ उभा राहिला. दरम्यान, दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी बशीरची गोळ्या झाडून हत्या केली.
वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.