संग्रहित छायाचित्र
गिनी : पश्चिम आफ्रिकी देश गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेफरीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे फुटबॉल फॅन्स आपापसात भिडले, ज्यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गिनीतील शहर एन जेरेकोर येथे फुटबॉल सामन्यादरम्यान रविवारी (१ डिसेंबर) ही घटना घडली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडीओ देखील व्हायरल होत आहे. यामध्ये मैदानाबाहेर रस्त्यावर लोक आपापसात भिडत असल्याचे दिसून येत आहे. जमिनीवर अनेकजण जखमी अवस्थेत पडलेले देखील दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त फुटबॉल फॅन्सनी एन'झेरेकोर पोलीस स्टेशनची तोडफोड केली आणि आग लावली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार १०० हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'मॅच रेफरीच्या वादग्रस्त निर्णयाने हिंसाचार सुरू झाला. यानंतर फॅन्सनी मैदानात घुसून हल्लाबोल केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले की, हा सामना गिनी जंटा नेता मामादी डुम्बौया यांच्या सन्मानार्थ आयोजित स्पर्धेचा भाग होता. २०२१ च्या सत्तापालटात डुम्बौयाने सत्ता काबीज केली होती आणि स्वत:ला अध्यक्ष म्हणून स्थापित केले होते. पश्चिम आफ्रिकन देशात अशा स्पर्धा सामान्य झाल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.