अटक टाळण्यासाठी केला हिंसाचार; न्यायालयाने केला ८ प्रकरणांत इम्रान खान यांचा जामीन रद्द; हिंसाचारप्रकरणी इम्रान दोषी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे २०२३ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने ८ प्रकरणांमध्ये इम्रान खान यांचा जामीनही रद्द केला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे २०२३ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने ८ प्रकरणांमध्ये इम्रान खान यांचा जामीनही रद्द केला आहे. याखेरीज दबाव टाकण्यासाठी इम्रान खान यांच्या समर्थकांकडून निदर्शने करण्यात येत असून हिंसाचार घडवून आणला जात असल्याचा शेरा न्यायालयाने मारला आहे.

न्यायाधीश मंजर अली गिल यांनी आपल्या लेखी निर्णयात म्हटले आहे की, इम्रान खानविरोधातील हिंसाचाराशी संबंधित ऑडिओ आणि व्हीडीओ पुरावे सादर करण्यात आले आहेत. ते त्यांना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. कोर्टाने आपल्या निर्णयात इम्रान यांच्या विरोधात दिलेल्या साक्षींचाही हवाला दिला आहे. यापैकी जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या समर्थकांना भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप होता. अटकेच्या भीतीने सरकारी यंत्रणेला हानी पोहोचवण्याचा कट रचल्याचा आरोप इम्रानवर होता. इम्रानवरील आरोप गंभीर असल्याचे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. त्यांनी लष्करी आणि सरकारी मालमत्तांवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते. इम्रान यांच्या समर्थकांनी त्यांची आज्ञा पाळली आणि लष्करी तळ, सरकारी इमारती आणि पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले केले.

खान यांच्या सूचनेवरून हल्ले
न्यायालयाने म्हटले की, ९ मे नंतर पुन्हा ११ मे रोजी झालेल्या हिंसक घटना आणि पोलीस अधिकाऱ्यांवर हल्लेही इम्रान खान यांच्या सूचनेवरून झाले. या प्रकरणात गुप्त पोलीस अधिका-यांचे रेकॉर्डिंग सरकारतर्फे सादर करण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest