एक शहर हो सपनोंका

सौदी अरबचे राजे आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांनी जगातील सर्वात मोठे शहर उभारण्याचा प्लॅन आखला आहे. जगातील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त शहराच्या उभारणीसाठी ४०० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 20 Feb 2023
  • 01:56 am
एक शहर हो सपनोंका

एक शहर हो सपनोंका

सौदी अरबमध्ये उभारणार जगातले मोठे शहर; भारतीयांना रोजगाराच्या संधी

#रियाध

सौदी अरबचे राजे आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांनी जगातील सर्वात मोठे शहर उभारण्याचा प्लॅन आखला आहे. जगातील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त शहराच्या उभारणीसाठी ४०० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.  

न्यू मुरब्बा डेवलपमेंट कंपनी हे शहर उभारणीचे काम करणार आहे. २०३० साली या शहराच्या उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. या शहरापासून सौदी अरब देशाला ४८ अब्ज डॉलरचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. सौदी अरबचे अर्थकारण तेलविक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर चालते. त्यामुळे देशाला उत्पन्न मिळवून देणारा एक सशक्त पर्याय म्हणून या शहराच्या उभारणीचा प्लॅन सौदी अरबचे राजे आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांनी आखला आहे. आता जगातले सर्वात मोठे शहर भारले जाणार म्हटल्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे भारतीय कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सौदी अरब देशातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार सक्रिय आहेत. याखेरीक बांधकाम क्षेत्रातील अभियंते, धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या व्यवस्थापकीय स्तरावरील मनुष्यबळात भारतीयांचा समावेश होतो.

कसे असणार शहर

हे शहर तब्बल २० चौरस किलोमीटर क्षेत्रात वसवले जाणार आहे. या प्रकल्पामुळे सौदी अरबमध्ये ४ लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. शहरात एक संग्रहालय, एक औद्योगिक विद्यापीठ, पारंपरिक शिक्षण देणारे विद्यापीठ उभारले जाणार आहे. याशिवाय शहरात ८० पेक्षा जास्त मनोरंजन विश्वातील गरजा पूर्ण करणारे ठिकाणे उभारण्यात येणार आहेत. सौदीची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या जुळ्या शहराची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा रियाधचा डाउनटाऊन एरिया असणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण भारत तेलविक्रीतून आलेल्या पैशांवर अवलंबून असता कामा नये, अर्थकारणाला अन्य पर्याय असायला हवा, या हेतूने रियाधला जगातील अत्याधुनिक महानगराचा टच देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या नव्या शहरात लाखोंच्या संख्येने नागरिक वास्तव्य करू शकतील. ३ लाख ३४ हजार लोकांना या शहरात रोजगार मिळू शकेल. यात भारतीयांचे प्रमाण जास्त असणार आहे. या नव्या शहर उभारणीच्या प्रकल्पाला न्‍यू मुरब्‍बा प्रॉजेक्‍ट या नावाने ओळखले जात आहे. सौदी अरब या शहराच्या उभारणीनंतर दुबई आणि अबुधाबी या शहरांशी स्पर्धा करू शकणार आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest