चीन पुरवतोय रशियाला आधुनिक लष्करी सामग्री
#पेंटागॉन
रशिया-युक्रेन युद्धामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेसमोर एक नव्हे आव्हान उभे राहिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांचा एक स्वतंत्र गट जागतिक राजकारणात सक्रिय झाल्याची भीती अमेरिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. यादरम्यान अमेरिकेने युरोपियन युनियनच्या सदस्यांना सोबत घेऊन रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही रशिया हे युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनसोबतच्या संघर्षात चीन रशियाला मदत करत असल्याचा आरोप नुकतेच अमेरिकेचे संरक्षण मंत्री अँटोनी ब्लिकन यांनी केला आहे. चीनमागच्या एक वर्षापासून रशियाला लष्करी सामग्री पुरवत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
रशिया-युक्रेन युद्धात इराणने रशियाला शस्त्रास्त्रे पुरवली असल्याचे समोर आलेले आहे. ब्लिंकन यांच्या आरोपानुसार चीनने रशियाला लष्करी सामग्री पुरवली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण चीनने उत्तर कोरियाला लष्करी सामग्री पुरवली आहे. उत्तर कोरियाच्या आण्विक संशोधन प्रकल्पास चीन पाठबळ पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेने यापूर्वीही केला होता. उत्तर कोरियाला नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका दक्षिण कोरियाला मदत करत असल्याने चीनने उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चीन 'अमेरिकेचा शत्रू तो आपला मित्र' या नात्याने रशियाला, उत्तर कोरिया आणि इराणला आर्थिक आणि लष्करी सहकार्य करत असल्याचा अंदाज अँटोनी ब्लिंकन यांनी व्यक्त केला आहे.
चीन आणि रशिया या दोन शक्तिशाली देशांची हातमिळवणी अमेरिकेसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळेच अमेरिकेने चीनला रशियाला छुपी मदत करणे थांबवण्याची तंबी दिली आहे. चीनने हा प्रकार थांबवला नाही तर चीनला परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. चीन हा इशारा कितीपत गांभीर्याने घेईल, हे सांगता येत नाही. कारण चीनने अमेरिका आणि मित्र देशांच्या विरोधाची तमा न बाळगता इराणसोबत संरक्षणविषयक सहकार्याचा करार केलेला आहे.
म्हणून भारताला जवळ ओढण्याचा प्रयत्न
एका अहवालानुसार, एक चिनी कंपनी युद्धाच्या दरम्यान युक्रेनमधील सर्व घडामोडी, आकडेवारी रशियाला पुरवत आहे. जगातील चीन, रशिया हे मोठे देश एकत्र आले आणि भारतासारखी उदयोन्मुख अर्थव्यवस्था या दोन देशांच्या जवळ जाणार असेल तर अमेरिकेसाठी हा डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. त्यामुळेच रशियाकडून तेलखरेदी करणाऱ्या भारतावर कुठल्याही प्रकारचे आर्थिक निर्बंध लादायला अमेरिका तयार नाही. भारताचा रशियासोबतची व्यावसायिक उलाढाल दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे त्यांच्यातले व्यावसायिक देवाणघेवाण वाढली तर त्याचा थेट फटका अमेरिकेला बसू शकतो. याउलट चीन आणि रशिया यांच्यातील व्यावसायिक उलाढाल १९० अब्ज डॉलरची आहे. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.