तालिबानमध्ये गर्भनिरोधकांवर बंदी

तालिबानी राजवटीने अफगाणिस्थानातील गर्भनिरोधकांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही गर्भनिरोधके म्हणजे पश्चिमी देशांनी मुस्लीम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. पहिल्या टप्प्यात ही बंदी दोन प्रमुख शहरांमध्ये राबवली जाणार आहे, त्यानंतर ती देशभरात लागू केली जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 20 Feb 2023
  • 01:58 am
तालिबानमध्ये गर्भनिरोधकांवर बंदी

तालिबानमध्ये गर्भनिरोधकांवर बंदी

म्हणे, हे तर लोकसंख्या नियंत्रणाचे षडयंत्र; गर्भनिरोधके जाळून टाकण्याचे आदेश

#काबूल

तालिबानी राजवटीने अफगाणिस्थानातील गर्भनिरोधकांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही गर्भनिरोधके म्हणजे पश्चिमी देशांनी मुस्लीम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. पहिल्या टप्प्यात ही बंदी दोन प्रमुख शहरांमध्ये राबवली जाणार आहे, त्यानंतर ती देशभरात लागू केली जाणार आहे.

एखादी घोषणा केली अथवा राजवटीने निर्णय लागू केला की, त्याच्या अंमलबजावणीसाठी तालिबानी फौज दडपशाहीचा मार्ग अवलंबत आहे. गर्भनिरोधकांवर बंदी लागू केल्यानंतर लगेच तालिबानी राजवटीचे लोक प्रत्येक घरा-घरात जाऊन या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देत आहेत. याशिवाय वैद्यकीय सामग्री विकणाऱ्या दुकानात जाऊन गर्भनिरोधकांनी भरलेली कपाटे रिकामी केली जात आहेत. आम्ही आता कुठलीच गर्भनिरोधक साधने विक्रीसाठी ठेवत नाही, कारण दर तीन दिवसाला मेडिकल दुकानांची तपासणी केली जाते आणि गर्भनिरोधक साधने सापडल्यास दुकान बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचे  एका मेडिकल स्टोअरच्या मालकाने म्हटले आहे.

वृत्तसंस्था

लोकसंख्या नियंत्रणाची औषधे फेकून द्या

तालिबानच्या कमांडरने सर्व मेडिकल दुकानांसाठी एक आदेश जारी केला आहे. ज्यात सर्व दुकानदारांनी त्यांच्याकडील लोकसंख्या नियंत्रणात ठेवणारी औषधे रस्त्यावर जमा करावीत आणि जाळून टाकावीत, असे या आदेशात म्हटले आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणणारी औषधे विकण्याची गरज नाही, हा पाश्चिमात्य देशांचा डाव आहे, त्यामुळे जो कोणी दुकानदार गर्भनिरोधक सामग्रीची विक्री करताना आढळेल, त्याच्यावर पश्चिमी देशांचा हस्तक असल्याचा खटला चालवण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest