‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा टीझर प्रदर्शित

स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तृत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिणी म्हणजे महाराणी ताराबाई राजाराम भोसले. त्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूनेदेखील केले. आता त्यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ असं या चित्रपटाचं नाव असून, नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 5 Mar 2023
  • 02:30 am
‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा टीझर प्रदर्शित

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा टीझर प्रदर्शित

स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तृत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिणी म्हणजे महाराणी ताराबाई राजाराम भोसले. त्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूनेदेखील केले. आता त्यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ असं या चित्रपटाचं नाव असून, नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेले अनेक महिने चर्चा होती. या चित्रपटातून बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकांमध्येदेखील आदर्श प्रस्थापित केला अशा अष्टपैलू स्त्रीचे म्हणजेच छत्रपती ताराराणी यांचे जीवन उलगडले जाणार आहे. नुकतेच याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

या टीझरच्या सुरुवातीलाच सोनाली कुलकर्णी साकारत असलेल्या ताराराणी यांचा करारी अंदाज दिसत आहे, तर त्यांनी दाखवलेल्या पराक्रमांची झलकही टीझरमधून समोर येत आहे. या टीझरमध्ये छत्रपती ताराराणी औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध मराठ्यांचे नेतृत्व करताना दिसत आहेत. 

चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले असून, प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून, या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story