राज कपूर यांचा बंगला गोदरेज ग्रुपकडे

बॉलिवूडमधील पहिले 'शो मॅन' हा मान मिळवणारे दिग्गज अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला विकण्यात आला आहे. गोदरेज ग्रुपने हा प्रसिद्ध बंगला १०० कोटी रुपयांत विकत घेतला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 20 Feb 2023
  • 02:05 am
राज कपूर यांचा बंगला गोदरेज ग्रुपकडे

राज कपूर यांचा बंगला गोदरेज ग्रुपकडे

बॉलिवूडमधील पहिले 'शो मॅन' हा मान मिळवणारे दिग्गज अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला विकण्यात आला आहे. गोदरेज ग्रुपने हा प्रसिद्ध बंगला १०० कोटी रुपयांत विकत घेतला.

राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर म्हणाले की, ‘‘या बंगल्याच्या अनेक आठवणी आहेत. आमच्या कुटुंबासाठी याचे महत्त्व खूप आहे. गोदरेज कुटुंब हा समृद्ध वारसा पुढे घेऊन जातील अशी आम्हाला आशा आहे.’’

देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या शेजारी असलेला हा बंगला सुमारे एक एकरमध्ये पसरलेला आहे.  या बंगल्याच्या जागी प्रीमियम निवासी प्रकल्प उभारला जाणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, “या जमिनीवर आम्ही प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित करू. या प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे ५०० कोटी असेल.’’

 २०१९ मध्ये गोदरेज ग्रुपनेच प्रसिद्ध आरके स्टुडिओही विकत घेतला होता. या स्टुडिओचे क्षेत्रफळ सुमारे सव्वादोन एकर आहे. त्याची मालकी राज कपूर यांचे पुत्र रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे होती. तिघांनीही परस्पर संमतीने हा प्रकल्प विकला होता. आरके स्टुडिओच्या या परिसरात सध्या आधुनिक निवासी अपार्टमेंट आणि लक्झरी रिटेल स्पेस विकसित केली जात आहे. राज कपूर यांनी १९४८ मध्ये आरके स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओने अनेक कल्ट आणि क्लासिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये 'आग', 'बरसात', 'आवारा', 'श्री ४२०', 'संगम', 'मेरा नाम जोकर', 'बॉबी' आणि 'राम तेरी गंगा मैली' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story