'पाकिस्तानची निर्मिती ही सगळ्यात मोठी चूक'

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील एका महोत्सवात हजेरी लावली होती. त्या वेळी त्यांनी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. त्यांच्याच देशात जाऊन त्यांना दहशतवादावरून सुनावल्याने भारतीयांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर भारतात परतलेल्या अख्तर यांना 'पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'हो, ती सर्वांत मोठी चूक होती', असे उत्तर दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 5 Mar 2023
  • 02:28 am
'पाकिस्तानची निर्मिती ही सगळ्यात मोठी चूक'

'पाकिस्तानची निर्मिती ही सगळ्यात मोठी चूक'

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील एका महोत्सवात हजेरी लावली होती. त्या वेळी त्यांनी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. त्यांच्याच देशात जाऊन त्यांना दहशतवादावरून सुनावल्याने भारतीयांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर भारतात परतलेल्या अख्तर यांना 'पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'हो, ती सर्वांत मोठी चूक होती', असे उत्तर दिले आहे.

लाहोर येथील फैज महोत्सवात हजेरी लावून भारतात परतलेल्या अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानमध्ये वक्तव्य आणि भारत-पाकिस्तान फाळणीबद्दलही भाष्य केलं. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहिल्यावर पाकिस्तानची निर्मिती ही चूक होती का, असा प्रश्न जावेद अख्तर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.

अख्तर म्हणाले, “मला वाटतं की, माणसाने केलेल्या १० सर्वांत मोठ्या चुका, या नावाने एक पुस्तक लिहिलं गेलं, तर त्यामध्ये पाकिस्तानची निर्मिती असेल. पाकिस्तानची निर्मिती अतार्किक, कारण नसलेली होती. आता जे झालंय ते सत्य आपण स्वीकारायलाच हवं. मात्र, जे झालं ते योग्य नव्हतं. धर्म कधीच देश तयार करत नाही. धर्म एवढा सशक्त नाही की, तो देश घडवू शकेल. असं असतं, तर इटली आणि युरोप धर्मावर आधारित देश असते. जर तुम्ही एका धर्मावर आधारित देश तयार करण्याचा विचार केला, तर ते कांद्यावरील सालीसारखं आहे. तुम्ही एक काढाल, तर तिथे पुन्हा दुसरी असेलच. तुम्हाला खरा कांदा शोधण्यासाठी साली काढत राहावं लागेल,” असं अख्तर म्हणाले.

“सध्याच्या पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लीम नाहीत, शिया मुस्लीमही नाहीत. फाळणी झाली, तेव्हा हे सगळे मुस्लीम होते, पण आता ते नाहीत. हळूहळू या सर्व गोष्टी दूर होत आहेत, नाहीशा होत आहेत. आता आपणही तीच चूक करण्याच्या मार्गावर आहोत, जी त्यांनी ७० वर्षांपूर्वी केली होती”, असं अख्तर हिंदू राष्ट्राचा उल्लेख करताना म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story