दीवार-शोले हे चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप

दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या दोघांमध्ये कधीही चांगले संबंध नव्हते. मात्र, दोघे याबाबत कधीही उघडपणे बोलले नाहीत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी बिग-बींसोबतच्या संबंधांबाबत भाष्य करताना ‘मला अजूनही दीवार आणि शोले चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप आहे,’ असे नमूद केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 20 Feb 2023
  • 02:03 am
दीवार-शोले हे चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप

दीवार-शोले हे चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप

दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या दोघांमध्ये कधीही चांगले संबंध नव्हते. मात्र, दोघे याबाबत कधीही उघडपणे बोलले नाहीत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी बिग-बींसोबतच्या संबंधांबाबत भाष्य करताना ‘मला अजूनही दीवार आणि शोले चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप आहे,’ असे नमूद केले.

शत्रुघ्न यांना ‘शोले’ चित्रपटात जयच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु तारखांअभावी त्यांना चित्रपट नाकारावा लागला होता. कोलकाता येथील एका कार्यक्रमात जेव्हा शत्रुघ्न यांना विचारण्यात आले की, ‘तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा भाग व्हायचे होते, परंतु सहभागी होता आले नाही, याची खंत असलेले चित्रपट कोणते?’ यावर शत्रुघ्न म्हणाले, ‘‘मला खेद आहे की, मी ‘दीवार’ चित्रपटात काम करू शकलो नाही. तो चित्रपट माझ्यासाठी लिहिला होता. ही स्क्रिप्ट माझ्याकडे आणली होती. मी ती सहा महिने माझ्याकडे ठेवली होती, पण मी चित्रपटातून माघार घेतली. मला ‘शोले’चीही ऑफर आली होती, पण तारखा न मिळाल्याने नंतर ही भूमिका अमिताभ बच्चन यांना देण्यात आली. त्यावेळी माझ्या अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरू होते.’’

मुलाखतीत शत्रुघ्न यांना दोन स्टार्समधील अहंकाराच्या संघर्षाबद्दल विचारण्यात आले, ज्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘‘हो, नक्कीच संघर्ष होतो. अभिनेत्यांचे स्वतःचे फॅन फॉलोइंग, स्टारडम असायचे. आम्हा लोकांना त्याच्याशी काही देणे-घेणे नसते. पण जेव्हा आपण समजूतदार असतो, तेव्हा आपल्याला कळते, मग अहंकारासारख्या गोष्टींमध्ये फारसे लक्ष दिले जात नाही. इंडस्ट्रीत माझे कोणाशीही वैर नाही, माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत.’’ आम्ही आता एकमेकांना समजून घेऊ लागलो आहोत. आपण त्या लोकांना विसरले पाहिजे जे आपल्याला त्रास देतात, असे सूचक वक्तव्यही त्यांनी या वेळी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story