राज कपूर यांच्यासोबत अफेअर नव्हते...

आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकेच नाही तर दिवंगत अभिनेते देव आनंद यांनीही त्यांच्या ‘रोमान्सिंग विथ लाइफ’ या आत्मचरित्रात दोघांच्या अफेअरबद्दल सांगितले होते. मात्र, आता एवढ्या वर्षांनी स्वतः झीनत अमान यांनी राज कपूरसोबतचे नाते नाकारले असून, यावर आपले मौन सोडले आहे. तसेच देव आनंद यांनी त्यांच्या आणि राज कपूरच्या नात्याबद्दल जे काही लिहिले ते चुकीचे आहे, असा दावादेखील केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 27 Feb 2023
  • 03:08 pm
राज कपूर यांच्यासोबत अफेअर नव्हते...

राज कपूर यांच्यासोबत अफेअर नव्हते...

आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकेच नाही तर दिवंगत अभिनेते देव आनंद यांनीही त्यांच्या ‘रोमान्सिंग विथ लाइफ’ या आत्मचरित्रात दोघांच्या अफेअरबद्दल सांगितले होते. मात्र, आता एवढ्या वर्षांनी स्वतः झीनत अमान यांनी राज कपूरसोबतचे नाते नाकारले असून, यावर आपले मौन सोडले आहे. तसेच देव आनंद यांनी त्यांच्या आणि राज कपूरच्या नात्याबद्दल जे काही लिहिले ते चुकीचे आहे, असा दावादेखील केला.

‘एबीपी आयडियाज ऑफ इंडिया २०२३ समिट’मध्ये झीनत यांना राज यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘राज साहेबांनी मला ‘सत्यम शिवम सुंदरम’साठी साइन केले होते. मी त्यांच्या चित्रपटाची नायिका होते. माझा त्यांच्याशी कधीच संबंध आला नाही. ना आधी ना नंतर. आमचे नेहमीच दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचे नाते होते.’’

२००७ मध्ये देव आनंद यांनी त्यांच्या ‘रोमान्सिंग विथ लाइफ’ या आत्मचरित्रात लिहिले होते की, ‘‘१९७१ मध्ये आलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटादरम्यान ते झीनत यांच्या प्रेमात पडले होते, परंतु त्यानंतर राज कपूर यांनी त्यांना ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाची ऑफर दिली आणि ते झीनतच्या जवळ गेले.’’ देव आनंद यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार, ते झीनत यांना प्रपोज करणार होते, राज कपूर यांच्यासोबतच्या जवळीकीमुळे त्यांनी असे केले नाही. मात्र, आता खुद्द झीनत यांनीच राज यांच्यासोबतच्या चर्चांचे खंडन केले. त्या म्हणाल्या, ‘‘पुस्तकात देव आनंद साहेबांचा दृष्टिकोन काय होता, हे मला माहिती नाही. पण तो पूर्णपणे चुकीचा होता हे मी ठामपणे सांगू शकते. मी माझ्या पुस्तकात नक्कीच याचा उल्लेख करेल. मी देवसाहेबांचा आदर करते, पण त्यांनी सांगितलेले चुकीचे आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story