महिला आयोगाने घेतली गौतमीच्या व्हीडीओची दखल

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हीडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणी ट्वीट केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 28 Feb 2023
  • 07:32 am

महिला आयोगाने घेतली गौतमीच्या व्हीडीओची दखल

महिला आयोगाने घेतली गौतमीच्या व्हीडीओची दखल

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हीडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणी ट्वीट केले आहे.

“लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरून चित्रीकरण करून चेंजिंग रूममधील खासगी व्हीडिओ समाजमाध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांवर वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील,” असे ट्वीट चाकणकर यांनी केले आहे. “महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी कपडे बदलत असताना मोबाइलवरून तिचा व्हीडीओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story