'माझ्यावर दोन-तीन वेळा प्राणघातक हल्ला'

गेले काही महिने एम. सी. स्टॅन हा ‘बिग बॉस-१६’मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस-१६’चे विजेतेपद जिंकल्यावर त्याच्यावर सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे स्टॅनचा चाहतावर्गही प्रचंड वाढला आहे. तो ज्या परिस्थितीतून इतका वर आला आहे, त्यामुळे त्याचं अधिक कौतुक होत आहे; पण आता एका मुलाखतीत त्याने याच सर्व परिस्थितीचे वर्णन केले असून, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता असे धक्कादायक विधान केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 28 Feb 2023
  • 07:34 am
'माझ्यावर दोन-तीन वेळा प्राणघातक हल्ला'

'माझ्यावर दोन-तीन वेळा प्राणघातक हल्ला'

गेले काही महिने एम. सी. स्टॅन हा ‘बिग बॉस-१६’मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस-१६’चे विजेतेपद जिंकल्यावर त्याच्यावर सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे स्टॅनचा चाहतावर्गही प्रचंड वाढला आहे. तो ज्या परिस्थितीतून इतका वर आला आहे, त्यामुळे त्याचं अधिक कौतुक होत आहे; पण आता एका मुलाखतीत त्याने याच सर्व परिस्थितीचे वर्णन केले असून, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता असे धक्कादायक विधान केले आहे.

स्टॅनने नुकतीच ‘द रणवीर शो’ या यू ट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस’बरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. लहानपणापासून त्याची झालेली जडणघडण, त्या परिस्थितीत जगताना त्याला मिळालेली शिकवण, आसपास घडणारी हिंसा, गुन्हेगारी विश्व याबद्दल स्टॅनने या मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. या वेळी काही लोकांनी त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता असेही तो म्हणाला.

स्टॅन म्हणाला, “आमच्या मित्राचा वाढदिवस होता. आम्ही त्याचा केक कापला आणि इतक्यात काही लोकांनी त्याला मारण्यास सुरुवात केली. मानेवर तलवारीने वार केला, तर दुसऱ्याने डोक्यात वार केला. हे सर्व काही आमच्या समोर सुरू होते. माझ्या बाबतीतही दोन-तीन वेळा असे घडले आहे. पी-टाऊनमधील काही लोकांनी मला जिवे मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी तसा प्रयत्नही केला होता. तीन-चार वेळा ते मला मारण्यासाठी माझ्या मागे आले होते, पण देवाच्या कृपेने मी दर वेळी वाचलो.”

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story