शाहरुखच्या 'त्या' सीनबाबत व्हीडीओद्वारे खुलासा
शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ९४६ कोटी रुपये कमावले आहेत. कमाईचे वेगवेगळे विक्रम तोडणाऱ्या पठाण चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ या गाण्याचा 'बिहाइंड द सीन' व्हीडीओ आता निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान बॅकग्राउंड डान्सर्ससह बॉस्को मार्टिसकडून कोरिओग्राफ केलेल्या डान्स स्टेपचा सराव करताना दिसत आहेत.
निर्मात्यांकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हीडीओमध्ये शाहरुख खानने मोठा खुलासा केला आहे. या गाण्यात शाहरुख खान शर्टलेस दिसला आहे, पण असं करण्यासाठी निर्मात्यांनी भलतीच शक्कल लढवली होती. शाहरुखला या गाण्यासाठी शर्टलेस व्हायचं नव्हतं आणि यासाठी तो स्वतःच्या निर्णयावर ठाम होता. मात्र, गाण्यासाठी असं करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला असं करावं लागलं, पण त्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकाला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. या व्हीडीओमध्ये शाहरुखच्या शर्टलेस न होण्याच्या निर्णयावर दिग्दर्शक सिद्धांत आनंद म्हणतोय, “शाहरुख खूपच लाजरा आहे. गाण्यात शर्टलेस होण्यास त्याने नकार दिला होता, पण ती गाण्याची गरज होती. त्यामुळे त्याला असं करावं लागलं.” त्यावर शाहरुख त्याला म्हणतो, “मी शर्टलेस व्हावं म्हणून तू मला काल पिझ्झा खायला घालत होतास.” त्यानंतर कोरिओग्राफर बॉस्कोसुद्धा शाहरुख खानला शर्टलेस होण्यासाठी विनंती करताना दिसत आहे. दोघांच्या बऱ्याच परिश्रमांनंतर आणि समजावल्यानंतर शाहरुख खान शर्ट काढण्यास तयार होताना दिसतो.
दरम्यान ‘यशराज फिल्म’च्या बॅनरखाली तयार झालेला ‘पठाण’ चित्रपट वर्षाच्या सुरुवातीचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने कमाईचे बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं असून, चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात ९४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.