वन डे क्रिकेट वर्ल्ड कप प्रक्षेपणानंतरही वॉल्ट डिस्नेच्या तोट्यात झाली वाढ
वॉल्ट डिस्नेचे भारतातील उत्पन्न २०२३ च्या एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळे जोरदार असेल असा अंदाज होता. मात्र, आर्थिक पातळीवरचे खरे चित्र काही वेगळेच आहे. कंपनीला डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या तिमाहीत जवळपास २६१३ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
गतवर्षीपेक्षा हा लॉस जवळपास १४४ टक्क्यांनी वाढला आहे. हा तोटा वर्ल्डकपसारखी मोठी स्पर्धेचे प्रक्षेपण करताना आलेल्या मोठ्या खर्चामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. एकीकडे डिस्ने स्पोर्ट्स तोट्यात असताना त्यांच्याशीच निगडित असलेल्या स्टार इंडियाला वर्ल्डकपचा फायदा झाला आहे. त्यांच्या उत्पन्नात जवळपास ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ प्रॉग्रामिंगमध्ये झालेली वाढ, प्रोडक्शन आणि योग्य प्रमाणात खर्चात झालेली वाढ यामुळे झाली आहे.
प्रतिसामना सरासरी खर्चात झालेली वाढ आणि त्यात प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या सामन्यांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे डिस्नेला हा तोटा झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जरी डिस्नेला भारतातील उद्योगात तोटा झाला असला तरी काही ठिकाणी मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या प्रेक्षकांमध्ये वाढ झाली असून जाहिरातीची संख्याही वाढली आहे. हे सर्व जाहिरातींचे दर थोडे घसरले असूनही घडले आहे.
विशेष म्हणजे स्टार इंडियाची सेवा देणारे डिस्ने हॉटस्टार यांच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. तसेच प्रतिग्राहक सरासरी उत्पन्नातही वाढ झाली आहे. डिस्नेला भारतीय उद्योगात झालेला तोटा हा त्यांच्यासमोरील आव्हानांना अधोरेखित करतो. भारतात क्रिकेट हा सर्वाधिक प्रसिद्ध खेळ आहे. प्रक्षेपणाचे हक्क मिळवण्यासाठी मोजावी लागलेली मोठी रक्कम आणि वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेचे व्यवस्थापन करण्यासाठी आलेला खर्च यामुळे डिस्नेच्या फायद्यावर मोठा परिणाम झाला.
जागतिक स्तरावर डिस्ने , ईएसपीएन आणि स्टार स्पोर्ट्सच्या उत्पन्नात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र कार्यवाही तोटा ३७ टक्क्यांनी घसरला. यामुळे एकूण नकारात्मक कामगिरीत भारतातील नुकसानीचा मोठा वाटा आहे.
डिस्ने आर्थिक वर्षाच्या तिमाहीत त्यांचे उत्पन्न फायद्यात आणण्यासाठी आखणी करत आहे. डिस्ने प्लसचे ग्राहक थोडे कमी झाले आहेत आणि ग्राहक वर्गणी देखील वाढवली आहे. यामुळे त्यांची कामगिरी सुधारेल, असा त्यांना विश्वास आहे.वृत्तसंंस्था