IPL 2024 : आयपीएल हंगामास आज चेन्नईमध्ये प्रारंभ

इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या ( Indian Premier League) हंगामास शुक्रवार, २२ मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. या उद्घाटनाला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारखे बॉलिवूडचे दिग्गज स्टार उपस्थित राहणार आहेत.

IPL 2024

आयपीएल हंगामास आज चेन्नईमध्ये प्रारंभ

अक्षयकुमार, टायगर श्रॉफ प्रमुख आकर्षण #चेन्नई

इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या ( Indian Premier League) हंगामास शुक्रवार, २२ मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. या उद्घाटनाला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारखे बॉलिवूडचे दिग्गज स्टार उपस्थित राहणार आहेत. सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध करण्यासाठी ए.आर. रहमान आणि सोनू निगम चेन्नईमध्ये असतील. आयपीएलच्या एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) उद्घाटनाची घोषणा केली आहे. एकापेक्षा एक  कलाकारांचे फोटो पोस्ट केले आहेत. आयपीएलचे (IPL) उद्घाटन संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. अक्षय आणि टायगर सध्या अली अब्बास जफर दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांत होणार आहे. गेल्या वर्षीच्या उद्घाटनाला रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया आणि गायक अरिजित सिंग यांनी हजेरी लावली होती. रश्मिका ग्रीन रूममध्ये जिमिकी पोन्नूला डान्स करतानाचा व्हीडीओही व्हायरल झाला होता. रहमान आणि सोनू बॉलिवूड गाण्यांव्यतिरिक्त देशभक्तीपर गाण्यांवरही सादरीकरण करतील. अक्षय आणि टायगरचा कार्यक्रम सुमारे ३० मिनिटांचा असेल. सोनू आणि रहमान एकत्रपणे काही बॉलिवूडची लोकप्रिय गाणी सादर करतील. तसेच कधीही न पाहिलेला एआर (ऑगमेंटेड रिॲलिटी) चे प्रदर्शन देखील यावेळी होणार असून ते यावेळचे खास वैशिष्ट्य आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिला सामना एम ए चिदंबरम स्टेडियमवर ८ वाजता सुरू होईल. सामन्याची नाणेफेक ७.३० वाजता होईल. आयपीएलचा पहिला सामना स्टार स्पोर्ट्स १ (इंग्रजी), स्टार स्पोर्ट्स १ (हिंदी), स्टार स्पोर्ट्स १ (कन्नड), स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, प्रवाह पिक्चर मराठी येथे पाहता येणार आहे. तसेच जगभरातील अनेक चॅनेलवर आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest