IPL 2024: मुंबईने राखली 'परंपरा'; सलग ११ वेळा पहिल्या सामन्यात पराभूत

यावर्षीच्या सीजन मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादमध्ये झाला. या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला.

संग्रहित छायाचित्र

यावर्षीच्या हंगामातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात अहमदाबादमध्ये झाला. या सामन्यात  गुजरातने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला. सलामीच्या सामन्यात मुंबईचा हा सलग ११ वा पराभव ठरला. अशा प्रकारे पहिल्या सामन्यात हरून मुंबईने आपल्या पराभवाची परंपरा कायम राखली आहे. 

गुजरातने प्रथम फलंदाजी करत १६८ धावांचे लक्ष्य मुंबईपुढे ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांत ९ बाद १६२ इतक्याच धावा करता आल्या. शेवटच्या २० धावा करताना मुंबईने आपले ५ गडी गमावले.  (IPL 2024)

या सामन्यात हार्दिक पांड्याने प्रथमच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधार पदाची धुरा शुभमन गिल याच्या खांद्यावर होती. गुजरातच्या संघाने आतापर्यंत दोन हंगाम खेळले असून दोन्ही वेळा अंतिम फेरी गाठली आहे. २०२२ साली गुजरातचा संघ मालिका जिंकला होता तर २०२३ मध्ये उपविजेता ठरला. 

काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. गुजरातने पहिल्या डावात १६८ धावांचे लक्ष्य मुंबईपुढे ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांत ९ बाद १६२ इतक्याच धावाच करता आल्या. 

फलंदाजी: 

गुजरात टायटन्स:

वृद्धिमान साहा - (१९ धावा, १५ चेंडू, ४ चौकार)

शुभमन गिल  - ((३१  धावा, २२  चेंडू, ३  चौकार, १ षटकार)

साई सुदर्शन - (४५ धावा, ३९ चेंडू, ३ चौकार, १ षटकार)

गुजरात - १६८ - ६ (२०.०)

 

मुंबई इंडियन्स:

ईशान किशन (० धावा) 

रोहित शर्मा (४३ धावा, २९ चेंडू, ७ चौकार, १ षटकार)

डेवाल्ड ब्रेव्हीस (४६ धावा, ३८ चेंडू, २ चौकार, ३ षटकार)

तिलक वर्मा (२५ धावा, १९ चेंडू, १ चौकार, १ षटकार)

मुंबई इंडियन्स - १६२ - ९ (२०.०)

 

गोलंदाजी: 

मुंबई इंडियन्स: 

जसप्रीत बूमराह - ३ विकेट्स

गेराल्ड कोएत्सी २ विकेट्स

पीयूष चावला १ विकेट

गुजरात टायटन्स:

अझमतुल्ला ओमरझाई  - २ विकेट्स

उमेश यादव  - २ विकेट्स

स्पेन्सर जॉनसन - २ विकेट्स

मोहित शर्मा - २ विकेट्स

साई किशोर - १ विकेट

आजचा सामना 

बेंगलूरु वि. पंजाब

सायंकाळी ७.३० वाजता

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest