Hockey : हॉकी मध्य प्रदेशचा थरारक विजय : 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा; हॉकी हरयाणा, हॉकी झारखंडही सेमीफायनलमध्ये

हॉकी (Hockey) मध्य प्रदेशने चुरशीच्या लढतीत पेनल्टी शूटआउटवर 4-3 असा विजय मिळवत 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. हॉकी हरयाणा, हॉकी झारखंड संघांनी अनुक्रमेहॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाला 4-1 आणि हॉकी मिझोरामला 2-0 असे हरवत आगेकूच कायम ठेवली.

Hockey

हॉकी मध्य प्रदेशचा थरारक विजय : 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा; हॉकी हरयाणा, हॉकी झारखंडही सेमीफायनलमध्ये

पुणे : हॉकी (Hockey) मध्य प्रदेशने चुरशीच्या लढतीत पेनल्टी शूटआउटवर 4-3 असा विजय मिळवत 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. हॉकी हरयाणा, हॉकी झारखंड संघांनी अनुक्रमेहॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाला 4-1  आणि  हॉकी मिझोरामला 2-0  असे हरवत आगेकूच कायम ठेवली. 

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये बुधवारी हॉकी मध्य प्रदेश आणि हॉकी बंगाल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. निर्धारित वेळेत 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआउटद्वारे निकालाची कोंडी फोडण्यात आली. त्यात हॉकी मध्य प्रदेशने बाजी मारली. ऐश्वर्या चव्हाणने दोनदा, प्रीती दुबे, इशिका चौधरीने प्रत्येकी एक गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. हॉकी बंगालकडून अनिशा डुंगडुंग, होरो संजना, सुष्मिता पन्नाने गोल केले तरी हॉकी मध्य प्रदेशच्या गोलकीपरने लिली ओमरचा गोल वाचवताना प्रतिस्पर्ध्यांना विजयापासून रोखले. 

तत्पूर्वी, मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. मात्र, मॅक्झिमा टोप्पोने 30व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर हॉकी बंगालला आघाडी मिळवून दिली. मात्र, 45व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करताना ऐश्वर्या चव्हाणने हॉकी मध्य प्रदेशला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

अन्य लढतीत हॉकी हरयाणाने हॉकी असोसिएशन ऑफ ओदिशावर 4-1 अशा फरकाने मात दिली. दीपिकाने पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना गोलखाते उघडले. त्यानंतर 14व्या मिनिटाला मैदानी गोल करताना आघाडी वाढवली. नेहा गोयलने 39व्या आणि नवनीत कौरने 54व्या मिनिटाला गोल करताना विजयात हातभार लावला. हॉकी  असोसिएशन ऑफ ओदिशाकडून एकमेव गोल नेहा लाक्राने 42व्या मिनिटाला केला. 

हॉकी झारखंडने  अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवताना हॉकी मिझोरामला 2-1 असे पराभूत केले. दीपिका सोरेंगने 27व्या आणि संगीता कुमारीने 33व्या मिनिटाला केलेले गोल त्यांच्यासाठी निर्णायक ठरले. हॉकी मिझोरामकडून भारताची स्ट्रायकर लालरेसियामीने 35व्या मिनिटाला एकमेव गोल केला. 

उपांत्यपूर्व फेरीतील शेवटच्या लढतीत यजमान हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी मणिपूर एकमेकांशी भिडले.उपांत्य फेरीत शुक्रवारी, हॉकी हरयाणा हॉकी झारखंडशी दोन हात करेल. हॉकी मध्य प्रदेशची गाठ हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी मणिपूर यांच्यातील विजेत्याशी झुंजेल.

निकाल -

 उपांत्यपूर्व फेरी 1: हॉकी मध्य प्रदेश: 1 (4) (ऐश्वर्या चव्हाण (45व्या मिनिटाला-पीसी; ऐश्वर्या चव्हाण, प्रीती दुबे, इशिका चौधरी,ऐश्वर्या चव्हाण - पेनल्टी शूटआउट) विजयी वि. हॉकी बंगाल 1 (3) (मॅक्सिमा टोप्पो 30वा -पीसी; अनिशा डुंगडुंग, होरो संजना, सुष्मिता पन्ना - पीएस). हाफटाईम: 0-0

उपांत्यपूर्व फेरी 3: हॉकी हरियाणा: 4 (दीपिका पाचव्या मिनिटाला - पीसी, 14वी; नेहा गोयल 39व्या मिनिटाला; नवनीत कौर 54व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी असोसिएशन ऑफ ओरिसा: 1 (नेहा लाक्रा 42व्या मिनिटाला). हाफटाईम: 2-0

उपांत्यपूर्व फेरी 3: हॉकी झारखंड: 2 (दीपिका सोरेंग 27व्या मिनिटाला, संगीता कुमारी 33व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी मिझोराम: 0 (लालरेमसियामी 35व्या मिनिटाला -पीसी). हाफटाईम: 1-0

हॉकी महाराष्ट्र: () विरुद्ध मणिपूर हॉकी: (). कढ:

सेमीफायनल लाइन अप

उपांत्य फेरी 1: हॉकी मध्य प्रदेश वि. हॉकी हरियाणा

पांत्य फेरी 2: हॉकी झारखंड वि.हॉकी महाराष्ट्र/ हॉकी मणिपूर

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest