Pakistan vs South Africa 2nd Test
Pakistan vs South Africa 2nd Test : केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. पण पराभवानंतरही पाकिस्तानने एक कमाल केली आहे. वास्तविक पाक संघानं एक मोठा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला फॉलोऑन दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने चोख प्रत्युत्तर देत 136 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. दक्षिण आफ्रिकेत फॉलोऑन इनिंगमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तान हा पहिलाच पाहुणा संघ ठरला आहे. केपटाऊनमध्ये पाक संघानं दुसऱ्या डावात 478 धावा केल्या होत्या.
वास्तविक, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 615 धावा केल्या होत्या. यादरम्यान रायन रिक्लेटनने द्विशतक झळकावले. त्याने 259 धावांची खेळी खेळली. कर्णधार टेंबा बावुमा आणि वॉरेन यांनीही शतके झळकावली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 194 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या खेळीनंतर दक्षिण आफ्रिकेने पाक संघाला फॉलोऑन दिला. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात सर्वबाद 478 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
136 वर्षात पहिल्यांदाच पाकनं केली 'ही' कामगिरी....
दक्षिण आफ्रिकेत फॉलोऑन दरम्यान सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तान हा पहिला पाहुणा संघ ठरला आहे. पाकनं तब्बल 136 वर्षे जुना विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. 1902 मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दरम्यान 7 गडी गमावून 372 धावा केल्या होत्या. मात्र आता हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर नोंदवला गेला आहे.
पाकसाठी मसूद-बाबरची दमदार कामगिरी....
केपटाऊन कसोटीत पाकिस्तानचा पराभव झाला असला तरी पण ते जिद्दीने लढले. असे असंल तरी ते दक्षिण आफ्रिकेला मोठे लक्ष्य देण्यात अपयशी ठरले. त्याच्याकडून कर्णधार शान मसदूने शतक केले. मसूदने 251 चेंडूंचा सामना करत 145 धावा केल्या. या काळात त्याने 17 चौकार मारले. बाबर आझमने 81 धावांची खेळी केली. त्याने 10 चौकार मारले. सलमान आघाने 48 धावांचे योगदान दिले होते. बाबरबद्दल बोलायचे तर त्याने पहिल्या डावातही अर्धशतक झळकावले होते.