अश्विनने अपमान केल्याचा शिवरामकृष्णनचा आरोप!

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ५०० कसोटी बळी घेण्याची कामगिरी करणारा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 7 Mar 2024
  • 05:14 pm
SivaramakrishnanaccusedofinsultingAshwin!

अश्विनने अपमान केल्याचा शिवरामकृष्णनचा आरोप!

#धरमशाला

 धरमशाला येथे उद्यापासून (गुरुवार ) कसोटीत तो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० कसोटी खेळणार आहे. अशी कामगिरी बनावण्याच्या मार्गावर असतानाच एका माजी दिग्गज खेळाडूने त्यांच्यावर गंभीर आरोप  केला आहे. भारताचा माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांने समाज माध्यमातून अश्विनवर गंभीर आरोप केला आहे.  यासोबतच माजी खेळाडूंचा अशाप्रकारे अपमान करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

अश्विनच्या १०० व्या आंतरराष्ट्रीय कसोटीपूर्वी तामिळनाडूचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन अश्विनवर आरोप करताना म्हणतो की, त्याला मी फोन केला. पण, त्याने माझा फोन कट केला. नंतर मी मेसेज पाठवला, पण अद्याप त्याला उत्तर दिलेले नाही. माजी क्रिकेटपटूंना असाच सन्मान मिळतो. भारतासाठी नऊ कसोटी सामने खेळलेले लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी ही गोष्ट उघड करताच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी अश्विनवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने मोठे विधान केले होते. आता पुन्हा स्टार स्पिनरवर निशाणा साधत असताना चाहते जुने ट्विट दाखवून त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. राजकोटमध्ये ५००  कसोटी बळी घेणारा रविचंद्रन अश्विन अचानक घरी परतला होता. बीसीसीआयने अश्विनबद्दल एवढेच सांगितले होते की, काही कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे अश्विनला घरी जावे लागले. मात्र,  अश्विनच्या घरात कोणती समस्या निर्माण झाली होती, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अश्विन एका रात्रीत घरी परतला होता. त्यानंतर तो सामना खेळण्यासाठी पुन्हा राजकोटमध्ये आला होता. आता अश्विनची पत्नी प्रीतीने उलगडा केला आहे.प्रीती सोशल मीडियावर म्हणते की, अश्विनची आई त्यादिवशी घरी पडली होती. त्यामुळेच अश्विनला रात्री चेन्नईला परतावे लागले. अश्विनची आई पडल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. या घटनेनंतर प्रीतीने अश्विनला फोन करण्याऐवजी चेतेश्वर पुजाराला फोन करून झालेल्या घटनेची कल्पना दिली. प्रीतीने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे आभार मानले आहेत. त्यांनी अश्विनला घरी जाण्यास मदत केली. सर्वांच्या सहकार्याने अश्विन रात्री उशिरा घरी आला. त्यानंतर आईंना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आईंनी स्वतः अश्विनला दुसऱ्या दिवशी परत जाण्यासाठी समजावले. आईने अश्विनला सामन्यासाठी संघात परतण्यास सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest