पाठदुखीमुळे श्रेयस त्रस्त

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

 Shreyassufferingfrombackpain

पाठदुखीमुळे श्रेयस त्रस्त

नवी दिल्ली: टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठदुखीच्या तक्रारीनंतर श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये राजकोट कसोटीला मुकण्याची शक्यता आहे.  राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला त्याच्या फिटनेस स्थितीबद्दल माहिती दिली आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.  

तिसऱ्या कसोटीसाठी आणि मालिकेतील त्यापुढील उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. या संदर्भात निवडकर्त्यांची बैठक होणार आहे. गुरुवारी (दि. ८) ही बैठक होणे अपेक्षित होते, मात्र ती झाली नाही.  डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा, फलंदाज केएल राहुल दुखापतीतून सावरत आहेत. याशिवाय विराट कोहली आणि मोहम्मद शमी हेदेखील उपलब्ध नाहीत.  

हैदराबाद कसोटीत दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडलेला केएल राहुल लवकरच तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. राहुलने क्वाड्रिसेप्सला दुखापत झाल्याची तक्रार केली होती, २०२२ मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. राहुलची दुखापत लक्षात घेऊन बीसीसीआयने त्याला बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले. रवींद्र जडेजाही येथे आहे. दोन कसोटी सामन्यांमध्ये अधिक वेळ उपलब्ध असल्यानेच राहुलला तिसऱ्या कसोटीत खेळणे शक्य होणार आहे. राहुलने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८६ धावा केल्या होत्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest