पृथ्वी शॉची भररस्त्यात सेल्फीवरून बाचाबाची

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉ याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये शॉ एका युवतीसोबत भररस्त्यात बाचाबाची करताना स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 17 Feb 2023
  • 06:34 pm
पृथ्वी शॉची भररस्त्यात सेल्फीवरून बाचाबाची

पृथ्वी शॉची भररस्त्यात सेल्फीवरून बाचाबाची

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉ याचा एक व्हीडीओ  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये शॉ एका युवतीसोबत  भररस्त्यात बाचाबाची करताना स्पष्टपणे दिसून येत आहे. भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि युवती यांच्यात बाचाबाची झाली. संबंधित युवतीच्या एका मित्राने या दरम्यान व्हीडीओ तयार केला असून या सर्व प्रकरणानंतर पृथ्वी शॉच्या मित्राच्या (आशिष यादव) गाडीवर हल्ला झाल्याची देखील चर्चा आहे. पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर दोनजणांनी हल्ला केला होता.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी पृथ्वी शॉच्या मित्राकडे प्रकरण थांबवण्यासाठी ५० हजारांची मागणी केली आहे. तसे केले नाही तर त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात येईल. त्याचवेळी या अपघातानंतर पृथ्वीच्या मित्रांनी तुटलेली काच गाडी घेऊन ओशिवरा पोलीस ठाणे देखील गाठले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest