IND vs ENG T20I Series 2025 | शमीचे वर्षभरानंतर टीम इंडियात पुनरागमन...! इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संधी, 'या' 2 वेगवान गोलदांजांना विश्रांती....

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. एकदिवसीय विश्वचषक फायनलनंतर तो आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 05:50 pm
IND vs ENG T20I Series 2025

IND vs ENG T20I Series 2025

IND vs ENG T20I Series 2025 | इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. एकदिवसीय विश्वचषक फायनलनंतर तो आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे.  युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हर्षित राणाही टी-20 मध्ये पदार्पण करणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून तीन वनडे मालिका सुरू होईल.

 शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध बंगालच्या सामन्यातून शमी दुखापतीनंतर परतला. तो सय्यद मुश्ताक अली  आणि विजय हजारे ट्रॉफीदेखील खेळला आहे, ज्यामुळे भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती शमीवर मागील वर्षी जानेवारीमध्ये इंग्लंडमध्ये घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून शमी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पुनर्वसन शिबिरात होता.

यशस्वी जयस्वाल,  ध्रुव जुरेल, हर्षित राणा यांची निवड

 शमी १४ महिन्यांनंतर पुनरागमन करत आहे. त्याने १९ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. अभिषेक शर्माला वगळण्यात आले, त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालला संधी मिळाली. शिवम दुबे, जितेश शर्मा, ऋषभ पंत आणि आवेश खान यांना स्थान मिळाले नाही. ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा यांना स्थान मिळाले. नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारताचा टी-२० संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वरुण चक्रवर्ती सुंदर.

Share this story

Latest