संग्रहित छायाचित्र
नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले. अंतिम फेरीत 89.46 मीटर थ्रो करत त्याने सिल्वर मेडल खिशात घातले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचं हे पाहिलं सिल्वर ठरलं.
विशेष म्हणजे पाकिस्तानाच्या अर्शद नदीम याने 92.97 मीटरचा थ्रो करत ऑलिम्पिक विक्रम केला आणि गोल्ड मेडल पटकावले. त्यामानाने अंतिम फेरीत नीरज चोप्रा याची याची सुरुवात निराशाजनक राहिली. परंतु दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो करत त्याने दुसरे स्थान कायम ठेवले. नीरजचा हा यंदाच्या मोसमातील सर्वोत्कृष्ट थ्रो होता. ग्रेनेडाच्या अँडरसन पिटर्सने 88.54 मीटरचा थ्रो करत ब्रॉन्झ पदक मिळवले.
2020 साली झालेल्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने गोल्ड पटकावले होते. पॅरिसमध्ये भलेही तो गोल्ड जिंकू शकला नसला तरी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके असणारा भारतातील तो केवळ चौथा खेळाडू ठरला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.