संग्रहित छायाचित्र
लाहोर : पाकिस्तानचा गुणवान परंतु विवादास्पद वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पुन्हा निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे.
आमिरने २०१९ मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमधून आणि डिसेंबर २०२० मध्ये पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण या वर्षाच्या सुरुवातीला तो टी-२०विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात परतला.
दुसरीकडे, पाकिस्तानचा फिरकी अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इमादही याच वर्षी २३ मार्च रोजी निवृत्तीवरून परतला. असमिरने नोव्हेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदाच निवृत्ती घेतली होती. त्यावेळी विदेशी लीगमध्ये खेळण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली असल्याचे कारण त्याने दिले होते.
३५ वर्षीय आमिर पाकिस्तानसाठी ३६ कसोटी, ६१ एकदिवसीय आणि ६२ टी-२० सामने खेळला. त्याने ६२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७१ विकेट घेतल्या आहेत. १३ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. याशिवाय त्याने ३६ कसोटी सामन्यात ११९ तर ६१ एकदिवसीय सामन्यात ८१ बळी घेतले. २०२३ मध्ये पत्करलेली निवृत्ती मागे घेतल्यानंतर परतल्यानंतर आमिर १२ टी-२० सामने खेळला आणि १२ विकेट घेतल्या.
इमादची आंतरराष्ट्रीय कारकीर्द इमाद वसीमने पाकिस्तानकडून ५५ एकदिवसीय आणि ७५ टी-२० सामने खेळले आहेत. या लेफ्ट आर्म स्पिनरने वनडेमध्ये ४४ आणि टी-२० मध्ये ७३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वनडेत ९८६ आणि टी-२० मध्ये ५५४ धावा केल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.