जागतिक ॲथलेटिक्स हेरिटेज कलेक्शनमध्ये गोल्डन बाॅय नीरजची ऑलिम्पिक जर्सी!

भारताचा गोल्डन बाॅय भालाफेकपटू नीरज चोप्राच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या जर्सीचा जागतिक ॲथलेटिक्स हेरिटेज कलेक्शनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारताचा गोल्डन बाॅय भालाफेकपटू नीरज चोप्राच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या जर्सीचा जागतिक ॲथलेटिक्स हेरिटेज कलेक्शनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या नीरजने यंदा ऑगस्टमध्ये संपलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. यंदा त्याने हंगामातील सर्वोत्तम ८९.४५ मीटर थ्रो केला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकले होते.

 सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा नीरज हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. नीरजच्या आधी कुस्तीपटू सुशीलकुमार आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली होती.

 नीरज चोप्रा हा भारतीय क्रीडा इतिहासात दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू आहे. त्याच्याआधी सुशीलकुमार, सिंधू आणि नेमबाजीत मनू भाकर यांनीही दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.

यापैकी नीरज चोप्रा, सुशील कुमार आणि पीव्ही सिंधू यांनी सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत ही पदके जिंकली. तर मनू भाकरने याच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन कांस्यपदके जिंकली होती. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने गेल्या वर्षी बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

ऑलिम्पिक पदार्पणात सुवर्ण जिंकून रचला इतिहास

ज्युनियर आणि सीनियर सर्किट्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर नीरज टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये त्याने ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. २०२२ मध्ये वर्ल्ड फायनलमध्ये रौप्य पदक आणि २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये त्याने ८९.९४ मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest