इंग्लंडविरुद्ध विराट खेळण्याची शक्यता कमी

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली व्यक्तिगत कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

ChancesofViratplayingagainstEnglandislow

इंग्लंडविरुद्ध विराट खेळण्याची शक्यता कमी

अखेरच्या कसोटीतील त्याच्या उपलब्धतेबाबतही साशंकता आहे. यामुळे मायदेशात  इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाचही कसोटीत तो खेळण्याची शक्यता नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

भारत-इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेचा तिसरा सामना राजकोट येथे १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान तर चौथा सामना रांची येथे २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. वैयक्तिक कारणास्तव कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकला नव्हता. कोहलीचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने नुकतीच आपल्या यूट्यूब चॅनलवर कोहली आपल्या दुसऱ्या मुलाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती दिली होती. 

‘‘क्रिकेटपटूंच्या कुटुंबाचा प्रश्न असतो, तेव्हा ‘बीसीसीआय’ ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असते. आता भारतीय संघात पुनरागमन कधी करायचे याबाबतचा निर्णय कोहलीच घेईल. सध्या तरी, तो या मालिकेत खेळेल असे वाटत नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. केएल राहुलही दुसऱ्या कसोटीला मुकला होता. तिसऱ्या कसोटीत त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. राहुल संघात परतल्यास रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणाला वगळले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest