मुंबई : फडणवीसांच्या कार्यालयात महिलेचा गोंधळ; पाटी काढून केली घोषणाबाजी, आरडाओरडा

विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असल्याने अत्यंत व्यग्र असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेचा असंतोष पाहायला मिळाला. एका अज्ञात महिलेने फडणवीसांच्या कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याने मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विनापास प्रवेश केल्याने मंत्रालयातील कडेकोट सुरक्षेबाबत चर्चा

मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असल्याने अत्यंत व्यग्र असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेचा असंतोष पाहायला मिळाला. एका अज्ञात महिलेने फडणवीसांच्या कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याने मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे. महिलेने कार्यालयाबाहेरची पाटी काढून टाकली, घोषणाबाजी केली. तसेच, आरडाओरडा करत काही काळ गोंधळ घातला आणि निघून गेली.

फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून मुलाखती आणि त्यातून मांडलेल्या राजकीय भूमिकेबाबत चर्चेत आहेत. दुसरीकडे चक्क त्यांच्या कार्यालयाची नासधूस झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मंत्रालयाचा अभ्यागतांसाठी असणारा पास न काढताच आत गेल्याचं सांगितले जात आहे. सचिव गेटमधून ही महिला मंत्रालयात गेल्याची प्राथमिक माहिती असून तिनं थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरच आपला असंतोष प्रकट केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

या महिलेचं काही काम प्रलंबित राहिल्यामुळे तिने फडणवीसांवरील आपला संताप अशा रीतीने व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची पाटी काढून टाकली, तेथे घोषणाबाजी केली. तसेच, आरडाओरडा करत काही काळ कार्यालयाबाहेर गोंधळही घातला. त्यानंतर ती महिला मंत्रालयातून निघून गेली. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पोलिसांकडून शोध सुरू

ही महिला पास नसतानाही मंत्रालयात शिरली कशी? कोणत्याही सुरक्षा कर्मचारी, अधिकाऱ्याने तिची विचारणा का केली नाही? थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर जाऊन तिने आपला राग का व्यक्त केला? तिचे कोणतं काम प्रलंबित होतं? सगळा प्रकार झाल्यानंतर ही महिला कुठे गेली? ही महिला नेमकी कोण होती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून त्या संदर्भात पोलीस सविस्तर तपास करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत. बैठकांचे सत्र सुरू आहे. यावर  ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह कार्यकर्त्यांशी विभागवार बैठक घेत आहेत. आता केवळ मुंबई आणि कोकण विभाग उरला आहे. १ ऑक्टोबर रोजी ते दोन्ही विभागांना भेटी देऊन बैठका घेतील. मराठा आरक्षणाची ही समस्या तर आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं. आजही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मागण्या केल्या. आता सध्याची त्यांची मागणी अंतिम आहे की नाही हे मला माहिती नाही. ते ज्या मागणीवर अडून बसले आहेत ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण दिलं जावे. याबाबत आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली होती. शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोकही आले होते.

सगळ्यांनी मिळून एका प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. त्यात म्हटलंय की मराठा समाजाला आरक्षण दिलं जावे. ते इतर कुणाच्या प्रवर्गातून दिलं जाऊ नये. आता मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवंय. मुख्यमंत्री ज्या दिवशी सांगतील की त्यांना मराठा आरक्षणाबाबत कुठला निर्णय घ्यायचा आहे आणि मी तो अडकवून ठेवला आहे, त्यादिवशी मी राजीनामाही देईन आणि राजकारणातून संन्यासही घेईन, असेही फडणवीस म्हणाले. 

एखादी बहीण चिडली तर पाहून घेऊ - फडणवीस 

लाडक्या बहि‍णीचा राग अनावर झाला म्हणून तिचा असंतोष पाहायला मिळाल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेबाबतही फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. एखादी बहीण चिडली असेल तर आम्ही पाहून घेऊ. कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर तेही पाहून घेऊ. आता माझे म्हणणे एवढेच आहे की, संबंधित महिलेची व्यथा समजून घेऊ. कार्यालयात नासधूस झाल्याची घटना कालची आहे.

त्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने हे कशाकरीता केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्विगनतेमधून तिने हे कृत्य केले का? तिची व्यथा काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. गृहमंत्र्याचेच कार्यालय सुरक्षित नसेल तर लाडक्या बहिणी कशा सुरक्षित राहतील? या प्रश्नावर ते म्हणाले, विरोधकांची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी रॉकेल ओतून घेतले आहे.

मंत्रालयात कुणाचीच अडवणूक केली जात नाही. काही लोक प्रश्न मांडण्यासाठी वरच्या मजल्यावरून जाळीवर उडी घेतात. याचा अर्थ ते आमचे विरोधक नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयाचे दरवाजे सामान्यांसाठी बंद करू शकत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest