ShivSena: पुन्हा रंगणार शिंदे विरुद्ध ठाकरे सामना; शिवसेनाप्रमुख समितीतून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा; शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 14 Jan 2025
  • 11:22 am
Ramdas Kadam On Uddhav Thackeray,ramdas kadam,#uddhav thackeray,balasaheb thackeray smarak,balasaheb thackeray,SHIV SENA,DEVENDRA FADNAVIS,Maharashtra  Politics,'Eknath Shinde,MahaYuti,बाळासाहेब ठाकरे स्मारक, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, ठाकरे गट, शिंदे गट, महायुती, राज ठाकरे

remove Uddhav Thackeray from the post of chairman of Balasaheb Thackeray Memorial Committee

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी पुढे येत आहे. यासाठी शिंदे गटातील नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. इतकेच नाही तर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा अशी मागणी करणारा ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला. आता शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहेत.

 

 

 

मुंबईतील वांद्रे परिसरातील रंगशारदा सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बीकेसीत महत्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार करण्याचे नियोजन आहे. याच बैठकीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होणार आहे.

 

 

नोव्हेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोअर टीममधील विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. त्या वेळी मोठा वाद उद्भवला होता. त्यावर भाजपने सारवासारव करत भाजपची अशी कुठलीही मागणी नसल्याचे फडणवीस यांनी सांगून वादावर पडदा टाकला होता. आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

 

 

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंच्या काही संबंध राहता कामा नये. जर उद्धव ठाकरे स्मारकामध्ये गेले तर वरून शिवसेनाप्रमुखांना वेदना होईल की ज्याने माझ्या विचारांशी गद्दारी केली तो माझा मुलगा माझ्या स्मारकामध्ये कसा येऊ शकतो? असं रामदास कदम म्हणाले.

 

 

 

बाळासाहेबांच्या जयंतीला शिंदेसेनेचा मेळावा

 

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल फुंकण्यात आले. त्यापाठोपाठ शिंदेसेनाही सक्रिय झाली आहे. वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक झाली. त्यात २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बीकेसीमध्ये महत्त्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार केला जाईल. तसेच स्थानिक निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली जाईल. शिंदेसेना २४ ते २९ जानेवारीदरम्यान सदस्यता मोहीम राबवणार आहे. दरम्यान, मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्यास शिंदेसेना अनुकूल आहे. तसेच मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि पदे रिक्त करून नवीन नियुक्त्या करण्यावरही एकमत झाले. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

 

 

शिंदेसेनेचा ठराव अन् फडणवीसांची कोंडी

 

सन 2014 मध्ये राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. तसा शासन आदेशही प्रसिद्ध करण्यात आला होता. पुढे सप्टेंबर 2016 मध्ये स्मारकासाठी विश्वस्त मंडळास सरकारने मान्यता दिली. स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. सुभाष देसाई सचिव तर आदित्य ठाकरे सदस्य म्हणून या समितीत होते. भाजप नेत्या पूनम महाजन आणि आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही या समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. पाच वर्षांसाठी या नियुक्त्या होत्या. या नियुक्त्या देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात झाल्या होत्या. त्यामुळे आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share this story

Latest