Raj Thackeray : मनोज जरांगे पाटील यांना कोण बोलायला सांगत आहे, राज ठाकरे म्हणाले...

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात नेत्या-नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना त्यात आता राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे.

 Raj Thackeray

मनोज जरांगे पाटील यांना कोण बोलायला सांगत आहे, राज ठाकरे म्हणाले...

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात नेत्या-नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना त्यात आता राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील  (manoj jarange patil) यांच्या पाठीमागे कोण आहे, त्यांना कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (MNS Raj Thackeray) म्हणाले आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोतल होते. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. ते आता महाराष्ट्र दौऱ्यावर असून मराठा समाजाला संबोधित करीत आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. कालपासून (१५ नोव्हेंबर) त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून, आज ते आज पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये आहेत. 

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केले ते म्हणाले, ''मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण कधीही मिळणार नाही. हे मी मनोज जरांगे पाटील यांना आधीच सांगितले आहे. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल.''

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest