Ajit Pawar Sharad Pawar Metting : या भेटीमागे दडलंय काय?; पुण्यात शरद पवार यांना भेटून अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. राज्यातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमी, अजित पवारांची कथित नाराजी तसेच मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) ताणलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर

Ajit Pawar sharad Pawar Metting

या भेटीमागे दडलंय काय?; पुण्यात शरद पवार यांना भेटून अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP)  बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. राज्यातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमी, अजित पवारांची कथित नाराजी तसेच मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) ताणलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीचा उद्देश काय, याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.

 दिवाळीनिमित्त शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील घरी शुक्रवारी (दि. १०) हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अजित पवार व शरद पवार यांचे यावेळी एकत्र सहकुटुंब जेवणही झाले. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे या भेटीविषयी राजकीय वर्तुळात पुन्हा विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तसेच, अजित पवार काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चांनाही पुन्हा जोर आला आहे. या दौऱ्यात अजित पवार मराठा आरक्षणावरही शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.

 शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. तसेच, त्यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यामुळे प्रतापराव पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार, शरद पवार तसेच पवार कुटुंबीय एकत्र आले. दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय बारामतीमध्ये गोविंदबाग येथे एकत्र येतात. यंदा प्रतापराव यांच्या पत्नीची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या बारामतीमध्ये येऊ शकणार नाहीत. त्यामुळे पवार कुटुंबीयांनी आज पुण्यात जात त्यांची भेट घेतली व विचारपूस केली. ही केवळ कौटुंबिक भेट होती, असे शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest