शक्तीप्रदर्शन करीत वाघेरेंचा उमेदवारी अर्ज दाखल; आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, अमोल कोल्हे, रोहित पवारांची उपस्थिती

शहरात विविध महापुरुषांना अभिवादन करत ग्राम दैवतांच्या मंदिरात आशिर्वाद घेऊन, दुचाकी रॅली, पदयात्रेने जोरदार शक्तीप्रदर्शनाने मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज दाखल केला.

शक्तीप्रदर्शन करीत वाघेरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

 - विकास शिंदे 
शहरात विविध महापुरुषांना अभिवादन करत ग्राम दैवतांच्या मंदिरात आशिर्वाद घेऊन, दुचाकी रॅली, पदयात्रेने जोरदार शक्तीप्रदर्शनाने मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज दाखल केला.

आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयात मावळ लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार रोहित पवार, कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित होते.

या पदयात्रेत युवा सेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार (Rohit Pawar), शेकापचे नेते बाळाराम पाटील, आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, प्रचारप्रमुख योगेश बाबर, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे  यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, तसेच इतर सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी‌ व‌ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गद्दारांचा भरला घडा, त्यांना शिकवू धडा...

या पदयात्रेत "गद्दारांचा भरला घडा, त्यांना शिकवू धडा", "एकजुटीने जागवा, निर्धार भगवा", "आता हवा, खासदार नवा", अशा घोषणांनी देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तर हातात घेतलेले मशाल चिन्ह, भगवे झेंडे, भगवे उपरणे, टोप्या अशा यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.

मावळचा गड कायम राखणार : संजोग वाघेरे

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजोग वाघेरे म्हणाले, "देशाची निवडणूक सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. जनहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणा-या, देशातील जनतेची फसवणूक करणा-या प्रवृत्तीविरुध्द ही निवडणूक होत आहे. महागाई, बेरोजगारीविरुध्द आणि दडपशाहीच्या राजकारणाविरोधात निर्णय घेण्यासाठी मतदार तयार आहेत. पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघात गद्दारी गाडली जाईल‌ आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय होईल. स्वाभिमानी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळचा गड कायम राखणार आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest