Sunil Tingre : वाड्यांबाबत अभिप्राय देणाऱ्यांना निलंबित करा; आमदार टिंगरे यांची चौकशीची मागणी

'पुणे शहराच्या मध्यभागात झोपडपट्टी पुनर्वसनाच्या (Slum Rehabilitation) नावाखाली' जुन्या वाड्यांचा पुनर्विकास (Redevelopment of old palaces) करण्याचा घाट घालून कोट्यवधी रुपयांचे हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) लाटण्याचा प्रयत्न झाला आहे.

Sunil Tingre

वाड्यांबाबत अभिप्राय देणाऱ्यांना निलंबित करा; आमदार टिंगरे यांची चौकशीची मागणी

नागपूर : 'पुणे शहराच्या मध्यभागात झोपडपट्टी पुनर्वसनाच्या (Slum Rehabilitation)  नावाखाली' जुन्या वाड्यांचा पुनर्विकास (Redevelopment of old palaces) करण्याचा घाट घालून कोट्यवधी रुपयांचे हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. वाड्यांना झोपडपट्टीसदृश असल्याचे अभिप्राय देणाऱ्या महापालिका (PMC) अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे,' अशी मागणी आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी विधानसभेत केली.

पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) घोषित केलेल्या झोपडपट्ट्यांनाच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या सवलती देण्यात येतात. असे असतानाही वाड्यांनाच झोपडपट्टी दाखवून पुनर्विकासाचे फायदे लाटण्यात येत असल्याचा प्रकार महापालिकेत करून उघडकीस आला आहे. या प्रकरणात आमदार टिंगरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

आमदार टिंगरे म्हणाले, 'पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा समोर आला आहे. विकासकाकडून महापालिका आणि 'एसआरए'च्या अधिकाऱ्यांशी संगनमत जुन्या वाड्यांना झोपडपट्टीसदृश दाखविण्यात येत आहे. या वाड्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना झोपडपट्टीधारक दर्शवण्यात येत आहे. या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी 'एसआरए'च्या नियमावलीनुसार 'टीडीआर' निर्माण करण्यात येत असून, पुणे शहरात अशा प्रकारे ७० झोपडपट्टीसदृश वाडे विकसित करण्याचा प्रयत्न झाला आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अभिप्रायामुळे हा 'टीडीआर' निर्माण झाला आहे. निर्माण झालेला 'टीडीआर', त्याची झालेली विक्री ही एक प्रकारची फसवणूक आहे. या प्रकरणात त्वरित कारवाई करून असे अभिप्राय देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest