रणसंग्राम २०२४: श्रीकांत शिंदेंनाही लोकसभा जड?

कल्याण: लोकसभा क्षेत्रात (Kalyan Lok Sabha 2024) शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी भाजप-शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी एकत्र येताना दिसत आहे. लोकसभा क्षेत्रात हे चित्र असताना विधानसभा क्षेत्रात मात्र वेगळेच चित्र दिसून येत असून

Kalyan Lok Sabha 2024

संग्रहित छायाचित्र

पुत्रासाठी मुख्यमंत्री भाजपला कोणती जागा सोडणार?

कल्याण: लोकसभा क्षेत्रात (Kalyan Lok Sabha 2024) शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी भाजप-शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी एकत्र येताना दिसत आहे. लोकसभा क्षेत्रात हे चित्र असताना विधानसभा क्षेत्रात मात्र वेगळेच चित्र दिसून येत असून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आपली ताकद दाखवण्यासाठी सरसावले आहेत. (Lok Sabha 2024)

डोंबिवली विधानसभा क्षेत्रात कामाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नेते एकत्र आले असताना कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात याच पक्षातील पदाधिकारी एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना महेश गायकवाड यांनी कल्याणमध्ये येताच आमदार गायकवाड यांच्यावर आरोप केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार गायकवाड यांच्या पत्नी आपल्या मुलांसह रणांगणात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कल्याण लोकसभा क्षेत्रात चालले तरी काय, असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदलीच्या प्रकरणानंतर आता आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहर प्रमुखावर केलेला गोळीबार यामुळे हे वाद चव्हाट्यावर आले आहेत. (Shrikant Shinde)

सध्याच्या घडीला विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळे तसेच सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी शिवसेना व भाजप पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी एकत्र येताना दिसत आहेत. यात मुख्यतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लक्ष वेधते. कल्याण लोकसभा क्षेत्रात सारे काही आलबेल आहे असे दिसत असताना विधानसभा क्षेत्रात मात्र वेगळेच चित्र रंगत आहे. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद टिकेला जाऊन आमदारांनी महेश याच्यावर पोलीस ठाण्यातच गोळी झाडली. महेश हे मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र व कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात कारागृहात असले तरी त्यांच्या पत्नी आता रणांगणात उतरल्या असून मुलांसह त्या प्रभागात फिरत आहेत. एकीकडे महेश गायकवाड हे उपचार घेऊन कल्याणमध्ये परतल्यानंतर त्यांनी त्वरित गणपत गायकवाड यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली होती.

भाजपच्या बॅनरवरून शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो झळकला

भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा या मुलासह घराबाहेर पडल्या आहेत. उल्हासनगर, कल्याण पूर्वेत विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका त्यांनी लावला आहे. तसेच भाजपकडून शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येत आहे. गायकवाड यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात १ कोटी ९५ लाखांची विकासकामे होत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. विकासकामांची माहिती देणाऱ्या बॅनरवर आमदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जय प्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही फोटो बॅनरवर छापण्यात आला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या एकाही नेत्याला बॅनरवर स्थान देण्यात आलेले नाही. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात १ कोटी ९५ लाखांची विकासकामे होत आहेत. त्या कामांचा तपशील बॅनरवर देण्यात आला आहे. त्याचे भूमिपूजन गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांच्या हस्ते होणार आहे. गायकवाड यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या बॅनरवर अजित पवारांचा फोटो आहे, पण शिंदेंचा फोटो नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध कायम असल्याचं दिसत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest