रणसंग्राम २०२४: संयुक्त जनता दलाचे नेते कपिल पाटील नवा पक्ष स्थापन करणार

मुंबई: संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) (Janta Dal United) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांनी इंडिया आघाडीला सोडून एनडीएचा हात हाती घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Kapil Patil

संग्रहित छायाचित्र

नितीशकुमार यांना महाराष्ट्रात धक्का; एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयाचे पडसाद

मुंबई: संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) (Janta Dal United) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांनी इंडिया आघाडीला सोडून एनडीएचा हात हाती घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नितीशकुमार  यांच्या या निर्णयाने इंडिया आघाडी कमकुवतही झाली आहे. मात्र, नितीश यांच्या आघाडी सोडण्याने केवळ इंडिया आघाडीतील नेतेच नाराज झालेले नाहीत तर जेडीयूचे नेतेही नाराज झाले आहेत. नितीश यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्र जेडीयूमध्ये पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पक्षाला रामराम करणार असून नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे.

आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत. मात्र, नितीश यांनी घेतलेल्या निर्णयावर कपिल पाटील नाराज आहेत. पुरोगामी शक्तींनी भाजपसोबत जायला नकोय, असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील लवकरच नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याची चर्चा आहे. (JDU in Maharashtra)

कपिल पाटील यांनी धारावीत एका सभेचे आयोजन केले आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच कपिल पाटील नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कपिल पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील जेडीयूचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कपिल पाटील नवीन राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. तसेच इंडिया आघाडीसोबतच आपण राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही पवार-ठाकरेंसोबतच

कपिल पाटील यांनी नुकतीच या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. नितीश यांनी भूमिका बदलली. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्वतः शरद पवार साहेबांनी देखील मला भेटायला बोलवले होते. नितीश हे भाजपसोबत गेले असले तरी आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतच आहोत. आमच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. धारावीत आम्ही मोठी सभा घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. या सभेला उद्धव ठाकरेही उपस्थित असतील. जे भाजपविरोधक आहेत, ते आम्हाला पाठिंबा देतील, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest