रणसंग्राम २०२४: एमआयएमचा डोळा मुंबईवर !

छत्रपती संभाजीनगर: मीरारोड काही ग्रामीण भाग नाही, मुंबई शहरातील एक भाग आहे. तेथे मुस्लीम समाजातील लोकांची दुकाने, घरे तोडली गेली, शिंदे सरकारने बुलडोझर लावून एकतर्फी कारवाई केली, त्याचा मी निषेध करतो.

संग्रहित छायाचित्र

छत्रपती संभाजीनगरची जागा धोक्यात? इम्तियाज जलील कुठून लढणार याचा अंतिम निर्णय लवकरच घेणार असल्याची ओवेसींची माहिती

छत्रपती संभाजीनगर: मीरारोड काही ग्रामीण भाग नाही, मुंबई शहरातील एक भाग आहे. तेथे मुस्लीम समाजातील लोकांची दुकाने, घरे तोडली गेली, शिंदे सरकारने बुलडोझर लावून एकतर्फी कारवाई केली, त्याचा मी निषेध करतो. तेथील लोकांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना फोन केले. येथे आमचे कुणीही ऐकणारा नाही. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याविषयी वक्तव्य केले आहे. अर्थात याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) विजयाची खात्री नसल्याने एमआयएमने आता मुंबईवर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे. (MIM News)

ओवेसी म्हणाले की, इम्तियाज जलील यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न लोकसभेत मांडले. धनगर, मराठा आरक्षण आणि मुस्लीम अल्पसंख्याक समाजातील गरीब लोकांसाठी त्यांनी सभागृहात आवाज उठवला. पाच वर्षातील त्यांची कामगिरी उत्तम राहिली, त्यामुळे त्यांनी लोकसभा कुठून लढवावी, या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. मुंबईच्या मीरा-भाईंदर परिसरात मुस्लिमांचे घर आणि दुकांनावर बुलडोझर फिरविल्यानंतर स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारा एकही पक्ष किंवा त्यांचा नेता तिथे फिरकला नाही. तेथील लोक मला, इम्तियाज जलील यांना फोन करून आमच्या मदतीला या, अशी याचना करत होते. अशावेळी आम्ही तिथे जाणार आणि त्यांचे अश्रू पुसणार. तथापि, ते कुठून निवडणूक लढणार यावर पक्ष अंतिम निर्णय घेईल. तसेच आम्हाला इंडिया आघाडीकडून कोणतेही निमंत्रण नाही, असेही ओवेसी यांनी सांगितले. ओवेसी म्हणाले की, आमच्या वतीने इम्तियाज जलील यांनी प्रस्ताव दिला होता. पण त्यावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने लढा देऊ आणि मोदी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार नाहीत, असा प्रयत्न करू.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest