संग्रहित छायाचित्र
मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे एक वजनदार नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आता भारतीय जनचा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. मात्र, खुद्द जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर मौन सोडत भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे. समाज माध्यमावरील भाजप प्रवेशाच्या वृत्तावर जयंत पाटील म्हणाले की, मी काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. माझ्या नावाची चर्चा होत असेल तर चांगलेच आहे. फुकटात प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येतं. आपण यावर नंतर बोलू. (NCP Sharad Pawar)
लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. राज्यात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले. सोमवार सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जयंत पाटील आणि माझी कुठेही, कसलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही किंवा त्यांचं माझ्याशी काही बोलणं झालेलं नाही. या कदाचित कपोलकल्पित बातम्या असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत कल्पनेला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येत आहेत. काहीजण तयारीत आहेत. तुम्हा पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकतं.
गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील रडले होते. शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचा विषय अवघ्या काही वाक्यात संपवत भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे.
आमचा पक्ष फुटला आहे
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आमदारांचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला.
अजित पवार सध्या उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच आव्हान देत दंड थोपटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. महाविकास आघाडीतले दोन महत्त्वाचे पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष भाजपाने खुबीने फोडले आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्हदेखील अजित पवारांना देण्यात आलं आहे. या सगळ्या परिस्थितीवर जयंत पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केलंं आहे.
लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढलं आहे. महाराष्ट्रात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले. काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले. भाजपा प्रवेशाच्या या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळल्या आहेत. तसंच राष्ट्रवादीतल्या फुटीवर त्यांनी भाष्य केलं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.