धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात, अभिनेता रितेश देशमुख भाऊ धीरज यांच्यासाठी मैदानात, महायुतीवर जोरदार टीका

लातूर : बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार असलेले त्यांचे बंधू धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत ‘‘धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात आहे,’’ अशी टीका करत भाजपसह महायुतीवर सोमवारी (दि. ११) निशाणा साधला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लातूर : बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार असलेले त्यांचे बंधू धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत ‘‘धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात आहे,’’ अशी टीका करत भाजपसह महायुतीवर सोमवारी (दि. ११) निशाणा साधला.

 धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत बोलताना रितेश देशमुख पुढे म्हणाले, ‘‘भगवान कृष्ण म्हणाले होते की कर्म हाच धर्म आहे. कर्म करत राहणे म्हणजे धर्म करणे. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला खरेच तो धर्म केल्यासारखा वाटतो. पण जे काम करत नाहीत, त्यांना धर्माची गरज पडते. सगळे म्हणतात की धर्म धोक्यात आहे. धर्म बचाव, धर्म वाचवा असे म्हणले जात आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतात की आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा.’’ काही गरज नाही अशा भुलथापांना बळी पडायची. त्यांना तुम्ही सांगा... धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही कामाचं सांगा. आमच्या पीक-पाण्याला तुम्ही काय भाव देता? आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत की नाही ते सांगा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

एक लाखांपेक्षा जास्त लीडने धीरज देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन  रितेश यांनी केले. ते म्हणाले, हा जनसागर म्हणजे खरी लीड आहे. महिला मेळाव्यातच विजय निश्चित झाला होता. लय भारी कार्यक्रम धीरजने केला आहे. खरे म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असते, गेल्या वेळी मी म्हणालो होतो की या गड्याला मतदान करा. एक लाख मतांनी तुम्ही सुद्धा मतदान केले होते. धीरजने देखील गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे काम केले आहे.
 
गेल्या वर्षी एक लाख मतांची लीड होती. यावेळी इतक्या जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेचे डिपॉझिट आत्ताच जप्त झाले पाहिजे. लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला झापूक झुपूक वारं झालेले आहे. त्यामुळे आता काहीही काळजी करू नका, पुढे धोका आहे. सावधान रहा. धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. आता बुक्कीत नाही, बटणावर टेंगूळ द्यायची वेळ आली आहे, असे रितेश देशमुख यावेळी म्हणाले.

रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची
 ‘‘लोकांसाठी काम करण्याची चळवळ धदीरज चालवत आहे. आपल्याला लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायचे आहेत. आई बहि‍णींचा त्रास कमी करायचा आहे. लातूर पॅटर्नमध्ये युवक शिक्षण घेत आहेत. पण रोजगार आहे का तुमच्या हातात. हा रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आहे का तुमच्याकडे रोजगार? पिकपाण्याला भाव आहे का,’’ असा सवाल उपस्थित करत रितेश देशमुख यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest