Namdev Jadhav : शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या नामदेव जाधव यांना काळे फासले

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्या तोंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.

Namdev Jadhav

शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या नामदेव जाधव यांना काळे फासले

पुणे : राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव (Namdev Jadhav)  यांच्या तोंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.

नवी पेठ येथील पत्रकार संघाच्या परिसरात  माध्यमांशी बोलत असतानाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले.पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. 

नामदेव जाधव हे शरद पवार यांच्यावर खोटे नाटे आरोप करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे असे पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. जाधव यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर त्यांना पुण्यातच काय राज्यातही फिरू देणार नाही असा इशारा काकडे यांनी दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest