तुतारी किंवा अपक्ष म्हणून लढण्याची आमदार बबन शिंदे यांची भूमिका

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे माढा विधानसभेसाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी मुलगा रणजीत शिंदे यांच्यासाठी तिकिटाची मागणी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 18 Oct 2024
  • 03:39 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे माढा विधानसभेसाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी मुलगा रणजीत शिंदे यांच्यासाठी तिकिटाची मागणी केली आहे. शरद पवार यांनी तूर्त काहीही शब्द दिलेला नाही. यामुळे मिळाली तर तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत बबन शिंदे आहेत. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

आपल्या उमेदवारीचा विचार करतो असे शरद पवार यांनी बबन शिंदे यांना सांगितले आहे.

पवार यांच्या भेटीबाबत शिंदे म्हणाले, तिकीट मिळाले नाही तर १९९५  प्रमाणे छत्री चिन्हावर मुलगा रणजीत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. 

माढा तालुक्यातील चव्हाणवाडी गावातील एका कार्यक्रमावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली . ते म्हणाले, पवारांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मी गेली ३८ वर्षे पवारांसोबत काम केले आहे. ते उमेदवारीचा विचार करतो म्हणाले आहेत. तुतारीचे तिकीट नाही मिळाले तर १९९५ सालाप्रमाणे छत्री चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी पंढरपूर भागातील शेगाव दुमाला येथे महायुतीचा विषय संपला आहे. तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. बारामती येथे जाऊन शरद पवारांना भेटलो असता त्यांच्याकडे तिकीट मागणारे अनेक लोक आले होते. त्यांना पाहून अनेकांना धडकी भरली असून त्यातील काहीजण गोंधळात पडले आहेत. त्यामुळे विरोधक काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story