Maval Lok Sabha: मुख्यमंत्री आले अणि न बोलता निघून गेले!

मावळ मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमाशी संवाद न साधता किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देता नमस्कार करून मुख्यमंत्री निघून गेले.

मुख्यमंत्री आले अणि न बोलता निघून गेले!

मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

विकास शिंदे
मावळ मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमाशी संवाद न साधता किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देता नमस्कार करून मुख्यमंत्री निघून गेले.  त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. सव्वाबाराच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नेते बाहेर आले. प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोटारीची काच खाली करत शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री शिंदे निघून गेले.

शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. २२) आकुर्डी-प्राधिकरण येथील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचाराची रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. सकाळी दहा वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि जय श्रीराम घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते

फडणवीस यांची अनुपस्थिती..

मावळ लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, फडणवीस हे अनुपस्थित राहिले. मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी हात दाखवला

महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. उमेदवारी अर्ज भरल्यावर माध्यमांशी न बोलता ते निघून गेले. प्राधिकरणाच्या बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाडीतून कार्यकर्त्यांना हात दाखवला आणि निघून गेले.

कार्यकर्त्यांची गर्दी

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्राधिकरणात मावळ लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने १०० मीटरची सीमा आखली आहे. पण, निवडणूक कार्यालयाने आखलेल्या १०० मीटरच्या आत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना आत घेतल्याने काही काळ गोंधळ झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest