Uttamrao Jankar controversial statement
“धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असा गंभीर आरोप शरद पवार यांच्या खास शिलेदारनं केल्यामुळं राजकीय वर्तुळात चांगली खळबळ माजली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे. त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच उत्तमराव जानकर यांनी मुंडेंसदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यात नव्या वादाला तोंड फुटले.
जानकर नेमकं काय म्हणाले?
“धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप करत जानकर म्हणाले, पहिल्याच दिवशी मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता. . गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता. गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे, असं वक्तव्य करत राज्य सरकारवरही जानकरांनी तोफ डागली.
तसेच, सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊनच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे. असा आरोप उत्तमराव जानकर यांनी यावेळी केला.
जानकर यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलच चर्चेत आलं आहे. त्यांच्य या वक्तव्यामुळं राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळं शरद पवार जानकर यांच्या या वक्तव्यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.