महाराजांनी आपल्याला हक्कासाठी लढ्याला शिकवलंय : संभाजीराजे छत्रपती
पुणे : मनोज जारांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा समाजाची (Maratha Andolan) बाजू मांडण्यासाठी सरकार पुढे अनेक प्रस्ताव पुढे ठेवले आहेत. आत्महत्या हा काही पर्याय नाही, महाराजांनी आपल्याला आपल्या हक्कासाठी लढ्याला शिकवलं आहे. आत्महत्या (Suicide) हा काही पर्याय नाही, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी (Sambhaji Raje Chhatrapati) केले.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा समाजावर लाठीचार्ज झाला तेव्हा मी प्रथम त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो.मी त्यांना तेव्हा ही सांगितलं तुम्ही आमरण उपोषण करा, पण पाणी पिउन करा.
त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. आज पाचवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालवली आहे. म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी पाणी पिऊन उपोषण करावे.
संभाजीराजे म्हणाले, मला चिंता वाटत आहे की मराठा समाजाची मुले आत्महत्या करत आहे. एका मुलाने चिठी लिहून आत्महत्या केली. एका मुलाने टाकीवर चढून उडी मारली. असे काही करू नका. मराठा समाजाच्या लोकांत रोष फार निर्माण झाला आहे. त्यांच्या भावना याच असतात की आम्हला आरक्षण कसे मिळेलमी देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य ऐकलं नाही. सरकार हे आंदोलन हेट करायला लागले आहेत. मात्र पूर्ण समाज त्यांच्या बाजूने आहे