संग्रहित छायाचित्र
रेणूका पवार
Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांचा वाद चांगलाच तापला असता. या वादात आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. 'दमदाटी करणं हा अजितदादांचा स्वभाव दोष असून प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही. तसेच अजित पवार मोठे नेते, ते कुणालाही पाडू शकतात, अशा शब्दात आव्हाडांनी टोला लगावला आहे.
प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आव्हाड म्हणाले, "दमदाटी करणे हा अजितदादांचा स्वभाव दोष आहे. मी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो, हे गप्प बस, उठू नकोस… असे अजित पवार बोलत होते. असं चालत नाही. तुम्ही घरी नाही, सार्वजनिक जीवनात आहे. प्रत्येकाला हृदयात मानसन्मान असतो. टीव्ही चालू असताना मला म्हणाले, ये गप रे…माझी मुलगी, पत्नी, नातेवाईक बघत असतील तर काय या जितेंद्रची इज्जत आहे. असा प्रश्न निर्माण होतो. मी त्यांच्यापासून लांबच राहायचो.”
आव्हाड पुढे म्हणाले, “पडून दाखवणार म्हणणारी लोकं मोठी आहेत. ते पूर्ण ४८ जागा निवडून आणू शकतात. पण प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही. या जगामध्ये माणूस यमाला देखील घाबरत नाही. तो कधीतरी येणारच. जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे?” असा प्रश्न आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.