Ajit Pawar : स्थिर सरकार कसं नाही? अजित पवार म्हणाले, एक मिनिट...

दोनशे आमदारांचा पाठिंबा असताना सरकार स्थिर नाही असं कसं होणार असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सरकार स्थिर नसल्याचा प्रश्न उपस्थित करताच पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

स्थिर सरकार कसं नाही? अजित पवार म्हणाले, एक मिनिट...

पुणे : (Pune) दोनशे आमदारांचा पाठिंबा असताना सरकार स्थिर नाही असं कसं होणार असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सरकार स्थिर नसल्याचा प्रश्न उपस्थित करताच पवार यांनी यावर भाष्य केले आहे. 

शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर पक्षात दोन गट तयार झाले त्यानंतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर आला. याबाबत आमदारांची सुनावणी वेगवेगळ्या कोर्टात सुरु आहे. दरम्यान, विरोधी पक्षासह अनेकांनी राज्यातील सरकार स्थिर नसल्याचे म्हणत सरकारला धारेवर धरले. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात भाष्य केले.

अजित पवार म्हणाले की, दोनशे आमदारांचा पाठिंबा असताना सरकार स्थिर नाही असं कसं होणार? प्रत्येकाचं वेगेवेगळ्या प्रकारे कामं चाललेलं आहे. सरकारचं सरकारी काम चाललेलं आहे. त्यामुध्ये मुख्यमंत्री विकासाला महत्व देतात. अनेकदा कोणी काही त्यांच्या बद्दलं बोललं तर ते म्हणतात मी कोण काय बोलतं याला महत्व न देता मी विकासाला महत्व देत पुढे जात आहे. 

प्रत्येकाला आपआपला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुध्ये कुणी सुप्रिम कोर्टात गेले आहेत, कुणी उच्च न्यायायलाय गेले, कुणी विधानसभा अध्यक्ष्यांकडे गेले आहे, कुणी निवडणूक आयोगाकडे गेलेले आहे. ज्याला कुणाला जो काही अधिकार आहे त्याचाबद्दलचा न्याय द्यायचा आणि ज्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. अशा ह्या सगळ्या गोष्ठी चाललेल्या आहेत. ही एक वेगळी प्रक्रिया आहे. त्यामध्ये कुणी ढवळाढवळ करत नाही ते त्यांचं काम चालू आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम सरकार म्हणून चाललेलं आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत. याशिवाय अनेक महत्वाच्या प्रश्नांविषयी त्यांनी माहिती दिली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest