Politics : अजित पवारांनी पहाटे पुलाची पाहणी केली यात आनंदच...; खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात येणार्‍या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी भागातील विकास कामांची पाहणी केली.

अजित पवारांनी पहाटे पुलाची पाहणी केली यात आनंदच...- अमोल कोल्हे

अशा करतो उड्डाणपूल लवकरात लवकर खुला व्हावा – अमोल कोल्हे

रेणूका पवार

पुणे : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असता सर्वत्र वातावरण तापलेले दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यातील वाद देखील शिगेला पोहचला आहे. शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात येणार्‍या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी भागातील विकास कामांची पाहणी केली.

या संदर्भात पवार म्हणाले, "मी काल अमोल कोल्हे यांना दिलेल्या चँलेंजचा आणि आजच्या दौऱ्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. अधिवेशन सुरु असतानाच चेतन तुपे यांनी मला याठिकाणी बोलावले होते.पण मी त्यांना सांगितलं होतं की, अधिवेशन संपल्यावर आपण पाहणी करु.त्यामुळे मी आज इथे आलो.लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मी सकाळी पाहणी केली", असे पवार यांनी पुढे म्हटले.

अजित पवारांच्या पाहणी नंतर अमोल कोल्हे यांनी देखील या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. या मुद्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "आनंदच आहे ना...उड्डाण पूल खुला व्हावा ही आम्ही गेले ६ महिने मागणी करत आहोत. यासंदर्भात मी स्वतःही देखील पाहणी केली होती. तसेच अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्या होत्या. आज दादांनी पाहणी केल्यानंतर लवकरात लवकर हा पूल खुला व्हाल अशी अपेक्षा"

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest